शबरीमला वाद: प्रवेश करणाऱ्या यादीतील ५१ महिलांपैकी अनेक पुरुष

शबरीमला वाद:  प्रवेश करणाऱ्या यादीतील ५१ महिलांपैकी अनेक पुरुष

केरळमधील शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेश प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली यादी बनावट असल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी: केरळमधील शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेश प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली यादी बनावट असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या ज्या महिलांनी मंदिरात प्रवेश केला त्यांची नावे या यादीत होती. राज्य सरकारच्या मते न्यायालयाच्या आदेशानंतर 51 महिलांनी मंदिरात प्रवेश केला आहे. पण सरकारने सादर केलेली ही यादी वादग्रस्त ठरली आहे.

राज्य सरकारने सादर केलेल्या यादीतील काही महिलांशी जेव्हा पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक अशी माहिती समोर आली. या यादीतील अनेक नावे पुरुषांची असल्याचे उघड झाले. यादीतील एका महिलेला फोन केला असता तो नंबर प्रत्यक्षात एका 47 वर्षीय पुरुषाचा असल्याचे आढळले. यादीतील कलावती नावाच्या महिलेला फोन केला असता तो नंबर प्रत्यक्षात टॅक्सी चालक शंकर नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. याशिवाय यादीतील अनेक महिलांनी मीडियासमोर त्यांचे वय 51 वर्षापेक्षा अधिक असल्याचे सांगितले.

सरकारने सादर केलेल्या यादी बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

या प्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान 10 ते 50 वयोगटातील 7 हजार 500 महिलांनी मंदिरात प्रवेशासाठी आधारद्वारे नोंदणी केली आहे. यातील 51 महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

First published: January 19, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading