'सबका साथ, सबका विकास आणि अब सबका विश्वास', नरेंद्र मोदींचा नवीन कानमंत्र

'सबका साथ, सबका विकास आणि अब सबका विश्वास', नरेंद्र मोदींचा नवीन कानमंत्र

एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. 30 मे रोजी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. राजधानी नवी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवाय, 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देखील नरेंद्र मोदींच्या नावाला आपलं समर्थन दर्शवलं. शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एलजेपी अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासहीत एनडीएच्या घटक पक्षांनी आपलं समर्थनं दिलं. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वांचे आभार मानले आणि नरेंद्र मोदींना शुभेच्छा देखील दिल्या.

नरेंद्र मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

'अधिकाधिक मनं जिंकण्याचा प्रयत्न'

'NDAच्या सर्व नेत्यांनी मला आशीवार्द दिला आहे. तुम्ही मला नेत्याच्या स्वरूपात स्वीकारलं. यास मी व्यवस्थेचा एक भाग मानतो. मी देखील तुमच्यातीलच एक व्यक्ती आहे. तुमच्या समानच आहे. खांद्याला खांदा मिळवून आपल्याला एकत्र चालायला हवं', असं म्हणत नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करण्यास सुरुवात केली.

पाहा:नरेंद्र मोदींना दुखवणाऱ्या साध्वी जेव्हा समोर आल्या, पाहा हा VIDEO

मोदींनी संविधानाला केलं नमन

NDAच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संविधान ग्रंथासमोर डोकं झुकवून त्यास नमन केलं.

पाहा:VIDEO :...हे लक्षात ठेवा, मोदींनी टोचले खासदारांचे कान!

गरिबांप्रमाणे अल्पसंख्याकांनाही छळलं - नरेंद्र मोदी

गरिबांसोबत होणाऱ्या छळावरही मोदींनी यावेळेस भाष्य केलं. मोदी म्हणाले की, 'देशातील गरिबांना छळलं गेलं आणि हिच वागणूक अल्पसंख्याकांनाही मिळाली आहे. पण आम्ही पाच वर्षांच्या कार्यकाळात गरिबांसोबत होणारा छळ रोखला आहे आणि थेट गरिबांपर्यंत पोहोचलो आहे, असं आम्ही म्हणू शकतो. देशावर जो गरिबीचा टॅग लागला आहे, त्यापासून देशाला मुक्त करायचं आहे. गरिबांच्या हक्कांसाठी आम्हाला जास्तीत जास्त कार्य करायचं आहे'.

मंत्रिपद मिळण्याच्या आशेनं फसू नका - मोदी

'मंत्रिपद मिळण्याच्या आशेनं स्वतःची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ देऊ नका, सावध राहा', अशी चेतावणीदेखील मोदींनी खासदारांना दिली आहे. पुढे ते असंही म्हणाले की,'मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वीच कित्येक नावांची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली आहेत. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. देशात आता कित्येक नरेंद्र मोदी जन्म घेत आहे, ज्यांनी मंत्रिमंडळाची यादीदेखील तयारी केली आहे. पण या भूलथापांना बळी पडू नका. वृत्तपत्रांच्या बातम्याद्वारे ना मंत्री होता येतं ना मंत्रिपद मिळतं'.

नवनिर्वाचित खासदारांना मोदींची ताकीद

आपलं बोलणंच आपल्याला संकटात आणू शकतं, असं सांगत मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना ताकीद दिली. ते म्हणाले की, 'मीडियाला नमुन्यांबाबत बरोबर माहिती असते. मीडियापासून सावध राहिल्यास बऱ्याच गोष्टींपासून तुम्ही वाचू शकता'.

2019ची निवडणूक माझ्यासाठी तीर्थयात्रा- मोदी

'स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. ही निवडणूक माझ्यासाठी एक तीर्थयात्रा ठरली आहे. सकारात्मक मतांची ही निवडणूक आहे. पुन्हा याच सरकारला सत्तेत आणायचं आहे, त्यांनाच काम द्यायचे आहे, जबाबदारी द्यायची आहे, याच सकारात्मक विचारानं एवढा मोठा जनादेश दिला आहे'.

निवडणुकीमुळे एका नव्या युगाचा आरंभ - मोदी

'देशातील जनतेनं एका नव्या युगाचा आरंभ केला आहे. आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत. 2014पासून ते 2019पर्यंत देश आपल्यासोबत आहे, कधीकधी देश आपल्या दोन पावलंदेखील पुढे गेला आहे, पण यादरम्यानही देशानं आपल्यासोबत भागीदारी केली आहे', असं सांगत मोदींनी जनतेचं आभार मानले

2019 निवडणुकीनं मने जोडली - मोदी

सर्वसाधारणतः निवडणुकीमुळे अंतर निर्माण होतं, फूट पडते, वाद होतात... पण 2019च्या निवडणुकीनं जोडण्याचं काम केलं आहे. मनं जुळवण्याचं काम केलं आहे.  2019ची निवडणूक सामाजिक एकतेचं एक आंदोलन बनली. समतादेखील, ममतादेखील, समभावही आणि ममभावही. या वातावरणामुळे निवडणुकीनं एक वेगळीच उंची गाठली, असंही मोदी म्हणाले.

SPECIAL REPORT : मृत्यूच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी

First published: May 25, 2019, 11:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading