मोदी-राहुल गांधींच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

मोदी-राहुल गांधींच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

मोदी आणि गांधींच्या आज अहमदाबादमध्ये सभा आहेत. गुजरात निवडणुकाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सध्या सुरू आहे. पण आता परवानगी नाकारल्यामुळे सभांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गुजरातच्या निवडणुका आता ऐन भरात आल्या आहेत.

  • Share this:

11 डिसेंबर:  गुजरात पोलिसांनी एक धाडसी निर्णय घेतलाय.  पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींच्या अहमदाबादमधल्या सभांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अहमदाबाद शहरातल्या वाहतुकीची समस्या लक्षात घेता सभांना परवानगी नाकारली आहे.

मोदी आणि गांधींच्या आज अहमदाबादमध्ये सभा आहेत. गुजरात निवडणुकाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सध्या सुरू आहे. पण आता परवानगी नाकारल्यामुळे सभांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गुजरातच्या निवडणुका आता ऐन भरात आल्या आहेत.गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालं आहे.  आता 14 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान आहे.  अशावेळी न्याय आणि सुव्यवस्था राखणं पोलिसांसाठी गरजेचं  आहे. त्यामुळे गुजरात पोलिसांनी शहरात वाहतूक सुरळीत राखण्यासाठी   हा निर्णय घेतला आहे. 18 डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदींच्या राज्यातील ही निवडणूक असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading