'जागतिक पातळीवर पाकिस्तानचे तोंड काळेच झाले'

'जागतिक पातळीवर पाकिस्तानचे तोंड काळेच झाले'

सामना संपादकीयमधून पाकिस्तानला खोचक टोला हाणण्यात आला आहे. काश्मीरप्रश्नी जागतिक पातळीवर आणि आता युनोच्या सुरक्षा मंडळातही तुमचे तोंड काळे झाले. स्वतःच्या पायावर आणखी किती धोंडे पाडून घेणार आहात?, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याचा अधिकारच नसल्याचं सांगितल्यानं संयुक्त राष्ट्रांनी चीन आणि पाकिस्तानला तोंडघशी पाडलं आहे. भारत आणि पाकिस्ताननं परस्पर चर्चा करून त्यांच्यातील प्रश्न सोडवावा, संयुक्त राष्ट्रांनी त्यात पडण्याचं कारण नाही, असं रशियाच्या प्रतिधिनीनं सांगितलं. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनंही तीच भूमिका मांडली. यामुळे पाकिस्तान आणि चीनची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. यावरून सामना संपादकीयमधूनही पाकिस्तानला खोचक टोला हाणण्यात आला आहे. काश्मीरप्रश्नी जागतिक पातळीवर आणि आता युनोच्या सुरक्षा मंडळातही तुमचे तोंड काळे झाले. स्वतःच्या पायावर आणखी किती धोंडे पाडून घेणार आहात?, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

(वाचा : काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि देशाचं वाटोळं केलं - शहा)

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- हिंदुस्थाननं काश्मीरप्रश्नी घेतलेल्या निर्णयामुळे थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला सगळ्या बाजूंनी थपडा बसत आहेत. तरीही तो देश ताळ्यावर यायला तयार नाही. घटनेचे 370 आणि 35 अ कलम रद्द करण्याचा हिंदुस्थानचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात नेण्याचा प्रयत्न पाकड्यांनी चीनच्या मदतीनं केला, पण तिथे हे दोन्ही देश तोंडघशीच पडले.

- जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयावर खुली चर्चा करावी, अशी मागणी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांकडे केली होती ती फेटाळली गेली.

- पाकिस्तानसारख्या देशासाठी ही नसती उठाठेन करून चीननंदेखील स्वतःचे तोंड पोळून घेतले.

(वाचा : राज ठाकरेंना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश!)

- पाकड्यांचे शेपूट हिंदुस्थानबाबत पूर्वीपासूनच वाकडे आहे आणि आता युनोच्या सुरक्षा मंडळात ते ठेचले गेले तरी त्याचा वळवळ कायमच राहणार हे उघड आहे. म्हणूनच 'कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला सज्ज आहोत', अशा पोकळ गमजा पाकिस्तान करत आहे.

- अमेरिकेनं 'तुमचे तुम्ही बघा' अशा शब्दांत फटकारल्यानंतरही पाकिस्तानची धुगधुगी आणि खुमखुमी कायम आहे ती चीनच्या 'ऑक्सिजन'वर, पण युनोच्या सुरक्षा मंडळात हे चिनी ऑक्सिजनचे सिलिंडरदेखील त्या देशाच्या उपयोगास आले नाही.

(वाचा : अधिकाऱ्यांनो कामं करा नाही तर लोकच झोडपतील-गडकरी)

तीन भारतीय महिला पाकिस्तानला ठरल्या भारी, हा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 06:52 AM IST

ताज्या बातम्या