नवी दिल्ली, 04 ऑक्टबर : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून 2 दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनासाठी पुतिन भारतात येत आहेत. या दौऱ्या दरम्यान पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे, तसेच अमेरिकेने इराणवर कच्च्या तेलाच्या आयातीवर लावलेल्या प्रतिबंधांसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे दोन्ही देशांदरम्यान 'एस-400 मिसाईल' करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. एस-४०० करार झाल्यास भारताच्या लष्करी सामर्थ्यात वाढ होईल. पाकिस्तान आणि चीनचा सामना करणे अधिक सोपे होईल. अमेरिकेची जशी भौगोलिक स्थिती आहे, तशी भारताची नाही. भारताला आपल्या शेजारी देशांचा सामना करण्यासाठी अशा प्रकारच्या सुरक्षा प्रणालीची गरज आहे.
काय आहे एस-४०० ?
एस-४०० एयर डिफेन्स मिसाईल प्रणाली आहे. याला जगातील सर्वात उत्कृष्ट मिसाईल प्रणाली समजले जाते. रशियाने १९९० मध्ये एस ४०० प्रणाली विकसित केली होती. चीननेदेखील रशियाकडून या प्रणालीची खरेदी केली आहे.
या सगळ्या करारासाठी आणि चर्चेसाठी व्लादिमीर पुतिन 19व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी 4-5 ऑक्टोबर रोजी दिल्लीत येणार आहेत. या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन पंतप्रधान मोदी यांच्याशी अधिकृत चर्चा करतील. ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
EXCLUSIVE VIDEO: ...आणि राहुल गांधी यांनी चक्क स्वतःचं ताट घासलं