Home /News /national /

रशियन महिलेसोबत लग्नासाठी तरुणाने गाठलं शिमला, सप्तपदीच्या आधीच सापडले पोलिसांना

रशियन महिलेसोबत लग्नासाठी तरुणाने गाठलं शिमला, सप्तपदीच्या आधीच सापडले पोलिसांना

लॉकडाऊनच्या काळात लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी दोघेही पोलिसांची नजर चुकवून शिमला इथं निघाले होते.

    शिमला, 07 मे : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. यातच हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रेमी युगुलाला पकडण्यात आलं आहे. महिला रशियन असून तिला भारतीयासह ताब्यात घेण्यात आलं आहे. शिमला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ओमापती जमवाल यांनी सांगितंल की, महिला आणि तिचा मित्र दोघेही बुधवारी जिल्ह्यात प्रवेश करत होते. नोएडा इथून दोघे कोणत्याही कर्फ्यू पास शिवाय ट्रकच्या मागे लपून येत होते. निर्मंड इथं मुलाच्या गावी पोहोचल्यानंतर लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन होता. रशियन महिलेचं वय 30 वर्षे असून तरुणाचं वय 20 आहे. याप्रकऱणी ट्रक चालक आणि क्लीनर दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रशियन महिलेला धौली इथल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये तर इतर तिघांना शोघी इथं क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पोलिस अधिक चौकशी करत आहेत. हे वाचा : लॉकडाऊनमुळे एक पेग दारूसाठी वणवण होत असताना जालन्यात धक्कादायक प्रकार देशात लॉकडाऊन असल्यानं लोकांना प्रवास कऱण्यास बंदी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. कामानिमित्त बाहेर पडण्यासाठी प्रशासनाकडून पास घेण्याची गरज आहे. जगभरात पसरलेल्या कोरोनाचा भारतातही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पाहा VIDEO : 'अपना टाइम आयेगा' लिहिलेला टी शर्ट घालून घराबाहेर पडला, पोलिसांना दिसताच...
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या