लज्जास्पद! मनालीत परदेशी महिलेवर गँगरेप

लज्जास्पद! मनालीत परदेशी महिलेवर गँगरेप

भारतीय हिमालय बघायला आलेल्या एका रशियन महिलेवर ती राहात असलेल्या हॉटेलजवळच सामूहिक बलात्कार करण्यात आला. दोन अज्ञात इसमांनी ही ३३ वर्षीय महिला जेवण करून रूमवर परतत असतानाच तिला घेरलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

  • Share this:

मनाली, २६ ऑक्टोबर : भारतीय हिमालय बघायला आलेल्या एका रशियन महिलेवर ती राहात असलेल्या हॉटेलजवळच सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही रशियन पर्यटक महिला जेवण झाल्यानंतर आपल्या रूमकडे निघाली होती, तेव्हा दोन माणसांनी तिला अडवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली.

भारतीयांची मान खाली जाईल असा हा लाजिरवाणा प्रकार शुक्रवारी उघडकीला आला. ३३ वर्षीय रशियन महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गँग रेपचा गुन्हा नोंदवला आहे, या बातमीला कुल्लूच्या पोलीस महासंचालक शालिनी अग्निहोत्री यांनी दुजोरा दिला आहे.

आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या महिलेनं दिलेल्या जबाबानंतर भारतीय दंडविधान कलम 341,382, 323, 504 376 याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

या घटनेमुळे भारतीय पर्यटनस्थळांबाबत असुरक्षेची भावना निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या आकर्षणाने अनेक विदेशी पर्यटक येत असतात. या पर्यटकांमध्ये अनेक महिला एकट्यानं प्रवास करणाऱ्याही असतात. भारतात गोव्यानंतर मनाली परिसरातच मोठ्या प्रमाणावर परदेशी - विशेषतः रशियन पर्यटक नियमितपणे येत असतात.

LIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद

First published: October 26, 2018, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading