VIDEO व्लादिमीर पुतिन यांच्या 'गुगली'ने मोदींनाही आश्चर्याचा धक्का

VIDEO व्लादिमीर पुतिन यांच्या 'गुगली'ने मोदींनाही आश्चर्याचा धक्का

रशियात होणाऱ्या परिषदेसाठी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना एका परिषदेसाठी खास पाहुणे म्हणून निमंत्रित केलंय.

  • Share this:

बिश्केक,13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी किरगिस्तानमधल्या बिश्केक इथं आज पोहोचले. पंतप्रधानांचं आगमन झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या व्दिपक्षीय बैठकांनाही सुरुवात झाली. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्यांनी आपल्या प्रतिनधीमंडळांसोबत चर्चाही केली. या बैठकीत पुतिन यांनी मोदींना ज्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे मोदींनाही आश्चर्याचा धक्का बसला.

पंतप्रधान मोदींना सलग दुसऱ्यांना ऐतिहासिक बहुमत मिळाल्याने जगभरातल्या नेत्यांकडून त्यांचं अभिनंदन होतंय. चर्चेला सुरुवात होताच पुतिन यांनी मोदींचं निवडणुकीतल्या यशाबद्दल अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुतिन म्हणाले. 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्येही विजयासाठी शुभेच्छा.

पंतप्रधान मोदींनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पुतिन यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले आणि मोदी म्हणाले. पुतिन यांनी पुढच्या निवडणुकीतल्या विजयासाठीही मला शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद.

चीनसोबतही चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये संवाद साधला. या चर्चेत महत्त्वाचा मुद्दा पाकिस्तानचाच होता. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही, असं मोदींनी जिनपिंग यांना ठामपणे सांगितलं.

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तान एकटा पडला होता. चीनने मात्र पाकिस्तानची पाठराखण केली होती. याच कारणांमुळे शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानबदद्लच्या भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले.

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध होत असला तरी चीन मात्र पाकला पाठिशी घालतो आहे. त्यामुळेच या दोन देशांमधली जवळीक रोखणं हे भारतासमोर मोठं आव्हान आहे.

काय आहे SCO ?

SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हा युरोप आणि आशियामधल्या देशांचा आर्थिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेला एक गट आहे. मागच्या वर्षी झालेल्या बैठकीत दहशतवाद संपवण्यासाठी काय पावलं उचलता येतील यावर चर्चा झाली होती. त्यामुळेच भारताने या व्यासपीठावर पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

First published: June 13, 2019, 9:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading