पुतीन यांचं भारतात आगमन, मोदींनी गळाभेट घेऊन केलं स्वागत

पुतीन यांचं भारतात आगमन, मोदींनी गळाभेट घेऊन केलं स्वागत

  • Share this:

नवी दिल्ली, 04 आॅक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं भारतात आगमन झालंय. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विमानतळावर जाऊन पुतीन यांचं स्वागत केलं.

विमानतळावर सुषमा स्वराज यांनी पुतीन आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. विमानतळावरून निघाल्यानंतर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी गळाभेट घेऊन पुतीन यांचं स्वागत केलं.

नवी दिल्लीत शुक्रवारी 19 वे भारत-रशिया वार्षिक द्विपक्षीय शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रशियन संरक्षण कंपन्यांच्या विरोधात अमेरिकेनं प्रतिबंधामुळे मोदी आणि पुतीन यांच्यातील द्विपक्षीय बैठकीकडे लक्ष्य लागले आहे.

या दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये इराणकडून कच्चे इंधन आयातीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इराणच्या मुद्यावर अमेरिकेनं आधीच प्रतिबंध घातले आहे.

पुतीन यांचा दौऱ्यात भारतासाठी महत्त्वाचा

एस-400 ट्रायअंफ मिसाईलच्या प्रणालीबद्दल करार होणार आहे. हा करार भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. या करारवर स्वाक्षरी होणार आहे. हा करार पाच अब्ज डॉलर इतका आहे.

==============================================

गीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 09:37 PM IST

ताज्या बातम्या