भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता रशियाची एंट्री

भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता रशियाची एंट्री

भारत आणि पाकिस्तानमध्ये रशियानं मध्यस्तीची तयारी दर्शवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढताना दिसत आहे. भारताच्या एअर स्ट्राइकला उत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला. शिवाय, पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील सुरू असून भारताकडून देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दोन्ही देशांमध्ये वाढता तणाव पाहता आता रशियानं मध्यस्तीची तयारी दर्शवली आहे.

सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असून यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी सारे प्रश्न शांततेणं आणि चर्चेनं सोडवावेत. सध्याची परिस्थिती पाहता रशियाला चिंता वाटत आहे. गरज पडल्यास दोन्ही देशांमध्ये आमची मध्यस्तीची तयारी आहे, असं रशियानं म्हटलं आहे.

भारताच्या मिग - 2000 या विमानांनी पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. त्यानंतर रशियानं आपली प्रतिक्रिया दिली.

पाक चर्चेसाठी तयार

भारताला 'जशास तसे उत्तर' देण्याची भाषा करणारा पाकिस्तान आता नरमला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेनं मार्ग काढूया असं म्हटलं आहे. दरम्यान, चीननं देखील दोन्ही देशांनी संयमानं आणि शांततेनं प्रश्न सोडवावेत असं म्हटलं आहे.

पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर फायरिंग; भारताचंही चोख प्रत्युत्तर

अमेरिका म्हणते भारतानं केलं ते योग्य

भारत- पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक पॉम्पियोशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोवाल यांनी पॉम्पियोशी मधअयरात्री फोनवर चर्चा केली. यानंतर डोवाल म्हणाले की, भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेला हल्ला योग्य असल्याचं अमेरिकेचं मत आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या या समर्थनादरम्यान आज गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलावण्या आली आहे. या बैठकीत सीमेवर चाललेल्या हालचालींवर चर्चा करण्यात आली.

अमेरिकेकडून भारत आणि पाकला विशेष आवाहन

संयुक्त राष्ट्र संघात प्रस्ताव

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे.

VIDEO : काय आहे जीनिव्हा करार? सांगत आहेत उज्ज्वल निकम

First published: February 28, 2019, 10:10 AM IST

ताज्या बातम्या