S M L

सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन; पंतप्रधानही सहभागी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंदही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. रन फॉर युनीटी मध्ये जवळ - जवळ 20 हजार नागरीकांनी सहभाग नोंदवलाय

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 31, 2017 09:14 AM IST

सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन; पंतप्रधानही सहभागी

दिल्ली,31 ऑक्टोबर: आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं नवी दिल्लीत रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलंय.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंदही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. रन फॉर युनीटी मध्ये जवळ - जवळ 20 हजार नागरीकांनी सहभाग नोंदविलाय. ध्यानचंद स्टेडियममधून रन फॉर युनीटीची सुरूवात करण्यात आलीय.दिल्लीप्रमाणे पुण्यातही एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. या एकता दौड मध्ये हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीष बापट आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.खंडूजीबाबा चौक ते सप महाविद्यालय  दरम्यान ही दौड होती.महापौर टिळक,पालकमंत्री बापट, खासदार शिरोळे शहर अध्यक्ष गोगावले अनेक नगरसेवक हजर होते. मात्र या नेत्यांनी न पळता पळण्याचा अभिनय केला. दौड असून हे नेते मात्र चालत गेले.याचप्रमाणे मुंबईतही रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं असून त्यात स्वत:मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 09:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close