सावधान! फटाके फोडण्याआधी कोर्टाने सांगितलेल्या 'या' 8 अटी एकदा वाचाच

दिवाळीच्या दिवशी फक्त रात्री आठ ते रात्री दहाच्या दरम्यानच तुम्हाला फटाके फोडता येतील.

  • Share this:

फटाक्यांतून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास होतो, अशी पाच वर्षांच्या तीन मुलांची तक्रार केली. त्यानंतर या मुलांच्या पालकांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने आज त्यावरच निर्णय दिला आहे. दिवाळीबाबत सर्वसामान्यांच्या लोकांच्या भावना लक्षात घेत कोर्टाने फटाकेबंदी तर केली नाही, पण काही अटी ठेवल्या आहेत.

फटाक्यांतून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास होतो, अशी पाच वर्षांच्या तीन मुलांनी तक्रार केली. त्यानंतर या मुलांच्या पालकांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने आज त्यावरच निर्णय दिला आहे. दिवाळीबाबत सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेत कोर्टाने फटाकेबंदी तर केली नाही, पण काही अटी ठेवल्या आहेत.

फक्त कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचीच आता विक्री करता येणार आहे. प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

केवळ ठरवून दिलेल्या ठिकाणी आणि ठराविक वेळेतच फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आलीय.

केवळ ठरवून दिलेल्या ठिकाणी आणि ठराविक वेळेतच फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आलीय.

दिवाळीच्या दिवशी फक्त रात्री आठ ते रात्री दहाच्या दरम्यानच तुम्हाला फटाके फोडता येतील.

दिवाळीच्या दिवशी फक्त रात्री आठ ते रात्री दहाच्या दरम्यानच तुम्हाला फटाके फोडता येतील.

ख्रिसमस आणि नववर्षाला रात्री 11:55 ते रात्री 12:30 पर्यंत फटाके फोडता येतील.

फटाक्यांची खरेदी केवळ लायसन्स असणाऱ्या दुकानातून करता येणार आहे. दिवाळीच्या सणाची परंपरा आणि दुसरीकडे वाढत असलेलं प्रदूषण या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवत संतुलित निर्णय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

फटाक्यांची ऑनलाईन विक्री करता येणार नाही. अशी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सुरक्षित फटाक्यांचं उत्पादन आणि विक्री आधीसारखीच सुरू राहील.फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2018 01:47 PM IST

ताज्या बातम्या