RSSवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत- अकबरुद्दीन ओवैसी

RSSवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत- अकबरुद्दीन ओवैसी

वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत राहणारे MIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

  • Share this:

हैदराबाद, 24 जुलै: वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत राहणारे AIMIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असे वादग्रस्त व्यक्तव्य अकबरुद्दीन यांनी करीमनगर येथील एका सभेत बोलताना केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अकबरुद्दीन आजारी होते. आजारपणातून बाहेर आल्यानंतर पहिल्याच सभेत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

RSS वाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. हे जग त्याच व्यक्तीला घाबरवते जो घाबरतो. पण जग त्याच व्यक्तीला घाबरते जो दुसऱ्यांना घाबरवतो. मागे मी 15 मिनिटांचे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य अनेकांच्या वर्मी लागले होते. माझ्या त्या वक्तव्याचे घाव ते अजून भरू शकले नाहीत. त्यामुळेच ते अकबरुद्दीन ओवैसीचा इतका द्वेश करतात, असे ते म्हणाले.

वादग्रस्त वक्तव्य करण्याची अकबरुद्दीन यांची पहिली वेळ नाही. याआधी 2013मध्ये त्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. आम्ही 25 कोटी आहोत आणि तुम्ही हिंदू 100 कोटी आहात. 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावर तेव्हा मोठा वाद झाला होता. याशिवाय त्यांनी RSS आणि मोदींवर देखील अनेकवेळा जोरदार हल्ला चढवला आहे.

करीमनगर येथील एका सभेत बोलताना त्यांनी मुसलमानांनी वाघासारखे शूर राहिले पाहजे, असा सल्ला दिला. मॉब लिंचिंग सारख्या घटनांवर बोलताना त्यांनी सांगितले की, तुमच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी झाली तर तुम्ही केवळ अल्लाचे नाव घ्या.

अकबरुद्दीन हे MIM पक्षाचे प्रमुख असउद्दीन ओवैसी यांचे लहान बंधू आहेत. ते तेलंगणा विधानसभेचे आमदार आहेत. वादग्रस्त वक्तव्य करुन अकबरुद्दीन नेहमी चर्चेत राहतात. काहीच दिवसांपूर्वी त्यांचे मोठे बंधू असउद्दीन ओवैसी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात लोकसभेतच वाद झाला होता. तेव्हा त्यांनी असे वक्तव्य केले होते की, सरकार आम्हाला भिती दाखवत आहे. पण आम्ही घाबरणाऱ्यापैकी नाही आहोत.

VIDEO : भाडोत्री-मालकामध्ये राडा, बघ्यांनीसुद्धा करून घेतले हात साफ

First published: July 24, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading