Elec-widget

किश्तवाडमधील RSS नेत्याच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात

किश्तवाडमधील RSS नेत्याच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात

किश्तवाडामध्ये आरएसएस नेत्याच्या हत्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

किश्तवाड, 14 एप्रिल : दहशतवाद्यांनी आपलं लक्ष आता स्थानिक नेत्यांकडे वळवलं आहे असंच म्हणावं लागले. कारण, काश्मीरमधील किश्तवाडा येथे आरएसएस नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये आता हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असून जाहीद हुसैन असं दहशतवाद्याचं नाव आहे. किश्तवाडामधील जिल्हा रूग्णालयाच्या बाहेर 9 एप्रिल रोजी आरएसएस नेता आणि रूग्णालयातील कर्मचारी चंद्रकांत शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षकांचा देखील मृत्यू झाला होता. 6 एप्रिल रोजी जाहीद हुसैन हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य झाला होता. जम्मू – काश्मीरमध्ये हिजबुलनं किलर टीम तयार केली आहे. ज्यामध्ये 16 ते 25 वयोगटातील युवकांचा भरणा आहे. काही ठराविक लोकांवर हल्ला करून त्यांना ठार करण्याचं काम या किलर टीमकडे सोपवण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर चंद्रकांत शर्मा यांची हत्या करण्यात आली.


लोकसभा निवडणूक 2019 : पहिल्या निवडणुकीपासूनच्या 6 आश्चर्यकारक गोष्टी


जिल्ह्यात कर्फ्यु

Loading...

दरम्यान, चंद्रकांत शर्मा यांची हत्या करण्यात आल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव किश्तवाडामध्ये कर्फ्यु लावण्यात आला. शिवाय, सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचा हिंसाचर भडकू नये म्हणून सुरक्षा दलांनी ही काळजी घेतली. जवळपास चार दिवस हा कर्फ्यु लागू करण्यात आला होता. चंद्रकांत शर्मा यांची हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.


वाराणसी: मोदींविरोधात 111 शेतकरी, BSF जवान आणि निवृत्त न्यायाधीश


वाढत्या दहशतवादी कारवाया

जम्मू - काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमध्ये अनेक टॉपच्या दहशतवादी कमांडरांचा खात्मा करण्यात आला आहे.


VIDEO : डोंबिवलीमध्ये कापड कंपनीला भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 08:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...