हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांना लष्करी कारवाईत सोबत न्या, संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य

हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांना लष्करी कारवाईत सोबत न्या, संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहयोगी सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.असे पुरावे मागणाऱ्यांना लष्करी कारवाईच्या वेळी सोबत घेऊन जा,असं म्हणत त्यांनी त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Share this:

ग्वाल्हेर, 9 मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहयोगी सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.असे पुरावे मागणाऱ्यांना लष्करी कारवाईच्या वेळी सोबत घेऊन जा,असं म्हणत त्यांनी त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेमध्ये ते म्हणाले, 'मी अनेक राज्यांमध्ये गेलो पण काही निवडक लोकांशिवाय कुणीच हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले नाहीत.'

सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौजेला 75 वर्षं झाल्याबद्दल संघाने सोहळा साजरा केला.पश्चिम बंगालमधल्या मतदारांची मतं मिळवण्यासाठी संघाने हा कार्यक्रम साजरा केला, असा आरोप करणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. अशा वक्तव्यांमुळे गोंधळात आणखीनच भर पडते,असं होसबळे म्हणाले.

दोन नव्हे भारताने तीन वेळा सर्जिकल स्टाईक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला दावा

लोकसभा निवडणूक ही फक्त पश्चिम बंगालमध्येच होणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पश्चिम बंगालपुरतं मर्यादित करता येणार नाही. त्याचप्रमाणे नारायण गुरू हे फक्त केरळचे आणि महात्मा गांधी हे गुजरातपुरते मर्यादित नाहीत,असं ते म्हणाले.

सरकारला समर्थन

संघाच्या प्रतिनिधीसभेत अमित शहा यांच्या उपस्थितीवरून टीका झाली. पण प्रतिनिधीसभेमध्ये सहयोगी संस्थांना निमंत्रण देण्यात आलं होतं. हे पहिल्यांदाच घडत नाही. याआधीही भाजप्या नेत्यांशी आमचा संवाद सुरूच होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीत संघाने काही विशेष आदेश दिले आहेत का या प्रश्नावर ते म्हणाले, अशा कोणत्याही सूचना आम्ही दिलेल्या नाहीत. पण मतदान 100 टक्के व्हावं यासाठी कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. या सरकारला आमचा पाठिंबा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

========================================================

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-349457" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzQ5NDU3/"></iframe>

First published: March 9, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading