शाळेत बाबरी विद्ध्वंसाचं नाटक सादर केल्याबद्दल RSS नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा

शाळेत बाबरी विद्ध्वंसाचं नाटक सादर केल्याबद्दल RSS नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा

RSS संचलित शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला बाबरी मशीद विद्ध्वंसाचं नाटक सादर केल्याबद्दल पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा आणि पुदुच्चेरीच्या राज्यपाल किरण बेदी उपस्थित होत्या, हे विशेष.

  • Share this:

बेंगलुरू, 17 डिसेंबर : एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला बाबरी मशीद विद्ध्वंसाचं नाटक सादर केल्याबद्दल पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा आणि पुदुच्चेरीच्या राज्यपाल किरण बेदी उपस्थित होत्या, हे विशेष.

कर्नाटकच्या किनारी भागातल्या मंगलोर शहरापासून जवळ कल्लाडका इथे श्रीराम विद्या मंदिर नावाची शाळा आहे. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कल्लाडका प्रभाकर भट चालवतात. त्यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असून अद्याप आम्ही कुणाला अटक झालेली नाही.

या भागात राहणारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे नेते अबूबक्र सिद्दीकी यांच्या तक्रारीवरून संघाच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बी. एम. लक्ष्मीप्रसाद यांनी यासंबंधी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "संघाचे नेते के. प्रभाकर भट आणि इतर चौघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 295 आणि 298 - धार्मिक भावना भडकवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून तपास सुरू आहे. पुरावा म्हणून अर्ध्या मिनिटाचा एक व्हिडिओ आम्हाला देण्यात आला आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे."

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला किरण बेदी उपस्थित होत्या. कार्यक्रमात मुलांनी सादर केलेल्या कौशल्याविषयी त्यांनी ट्विटरवरून कौतुकही केलं होतं. सोशल मीडियामधून या कार्यक्रमाविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्यावर प्रभाकर भट यांनी स्पष्टीकरण दिलं. इतिहासातल्या एका प्रकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि देशभक्तीची भावना प्रसारित करण्याचा उद्देश यामागे असल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी विद्यार्थी चालू घडामोडींवर आधारित विषयावर नाटक सादर करतात. यावर्षी सुप्रीम कोर्टाच्या अयोध्या प्रकरणावरील निर्णयाचा विषय विद्यार्थ्यांनी निवडला होता, असं ते म्हणाले.

अन्य बातम्या

पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ ट्वीट करून राष्ट्रवादीने फडणवीसांना लगावला सणसणीत टोला

आता मालमत्ता खरेदीत होणार नाही फसवणूक, मोदी सरकारने आणले नवे नियम

आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलीला घरात खेचत होता नराधम, आवाज ऐकून धावत आले 3 तरुण!

CAA दिल्लीत पुन्हा उडाला भडका, निदर्शकांनी पेटवली पोलीस चौकी

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 17, 2019, 7:47 PM IST

ताज्या बातम्या