VIDEO : 'स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तुंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही', पाहा काय म्हणाले मोहन भागवत

VIDEO : 'स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तुंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही', पाहा काय म्हणाले मोहन भागवत

मोहन भागवत म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लोकांचे ज्ञान आणि क्षमता याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

  • Share this:

नागपूर, 13 ऑगस्ट : चीनच्या कुरापती आणि कोरोनामुळे भारतात चीनी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय विदेशी वस्तूंपेक्षा स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासाठी सातत्यानं सांगितलं जात असतानाच आता मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्वदेशीचा अर्थ सांगताना मोठं वक्तव्य केलं.

'स्वदेशी वस्तूंचा वापर याचा अर्थ असा नाही की विदेशी वस्तूंवर सरसकट बंदी घालावी. जगभरात ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्याची भारतात कमतरता आहे अशा गोष्टी आपण वापरायला हव्यात. आम्ही त्या वापरणार अशी प्रतिज्ञा करतो', असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लोकांचे ज्ञान आणि क्षमता याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अनुभवावर आधारित ज्ञानाला पुढे आणण्याची आवश्यकता आहे असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले. विदेशी वस्तूंवर केवळ अवलंबून राहू नये. जर तसं करायचं असेल तर प्रत्येकानं आपल्या अटी आणि शर्तींवर ही गोष्ट करायला हवी.

हे वाचा-पार्थ प्रकरण: 'शरद पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नेते, ते बोलू शकतात'

भागवत यांनी प्रा. राजेंद्र गुप्ता यांच्या दोन पुस्तकांचे उद्घाटन करताना त्यांनी बाजाराऐवजी एक कुटुंब म्हणून जग समजून घेण्याची आणि स्वावलंबनासह सद्भावनेनं सहकार्य करण्याची गरज असल्याचंही सांगितलं आहे. सहकार्याची गरज अधोरेखित केली. भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या स्वावलंबी भारत अभियानाचे समर्थन करताना सरसंघचालक म्हणाले की स्वदेशी म्हणजे स्वदेशी उत्पादने आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे परंतु याचा अर्थ असा नाही की सर्व विदेशी उत्पादनांवर बहिष्कार घाला. जगात ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घेतल्या पाहिजेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 13, 2020, 8:18 AM IST

ताज्या बातम्या