मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाही’, सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी सांगितलं कारण

‘हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाही’, सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी सांगितलं कारण

"कोणताही हिंदू हा भारतविरोधी असू शकत नाही.'' असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक (RSS Chief) डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 2 जानेवारी:  "कोणताही हिंदू हा भारतविरोधी असू शकत नाही. तो हिंदू आहे म्हणजे देशभक्त आहे. तो त्याचा मुलभूत स्वभाव आहे,’’ असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक (RSS Chief) डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं आहे.  ‘देशभक्तीचा उगम हा धर्मातूनच झाला आहे,’ या महात्मा गांधी यांच्या वाक्याचा त्यांनी याबात संदर्भ दिला आहे. जे.के. बजाज आणि एम.डी. श्रीनिवास यांच्या  The Making of a True Patriot: Background of Gandhiji’s Hind Swaraj  या  पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

‘ते दुसरं पुस्तक लिहू शकतात’

‘’कोणत्याही महापुरुषाला कुणी आपल्या पद्धतीनं बंदिस्त करु शकत नाही. हे पुस्तक सखोल संशोधनावर आधारित आहे. ज्यांचं यापेक्षा वेगळं मत आहे, ते दुसरं पुस्तक लिहू शकतात,’’ असंही भागवतांनी स्पष्ट केलं. “माझ्या देशभक्तीचा उगम धर्मातून होतो, असं गांधीजींची मत होतं. मी धर्माला समजून घेतल्यानंतरच चांगला देशभक्त होईल, आणि लोकांना तसं सांगू शकेल. स्वराज्य समजण्यासाठी स्वधर्म समजणं आवश्यक आहे’’, असं गांधीजींनी सांगितल्याचा दावा भागवतांनी केला.

स्वधर्म आणि देशभक्तीचा उल्लेख करत सरसंघचालक पुढे म्हणाले, “हिंदू आहे म्हणजे तो देशभक्त असणार. तो निद्रीस्त असू शकतो, त्याला जागं करायला हवं पण कोणताही हिंदू भारतविरोधी असू शकत नाही.’’

‘विविधतेत एकता ही ओळख’

भागवत पुढे म्हणाले की, “ वेगळेपणाचा अर्थ आपण एका समाज म्हणून राहू शकत नाही, असा नव्हे. विविधतेत एकता ही भारताची खरी ओळख आहे.’’ या पुस्तकाचे लेखक जे.के. बजाज आणि एम.डी. श्रीनिवास यांनी गांधींजींचा पोरबंदर ते इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका ते भारतामध्ये परतण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात लिहिला आहे. ‘गांधीजींना त्यांच्या मुस्लीम मालकानं तसंच अनेक ख्रिश्चन सहकाऱ्यांनी धर्मांतरचा आग्रह केला होता. मात्र गांधीजींनी तो आग्रह मानला नाही. त्यानंतर ते 1905 पासून समर्पित हिंदू बनले’, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

First published:

Tags: RSS, Rss mohan bhagwat