सरसंघचालक मोहन भागवत Twitterवर; नरेंद्र मोदी नाही तर यांना करतात Follow !

RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील आता Twitterवर एन्ट्री केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 12:48 PM IST

सरसंघचालक मोहन भागवत Twitterवर; नरेंद्र मोदी नाही तर यांना करतात Follow !

मुंबई, 01 जुलै : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देखील आता ट्विटरवर एन्ट्री केली आहे. महत्त्वाचं म्हणजे मोहन भागवत यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड आहे. पण, त्यांनी अद्याप एक देखील twitt केलं नाही. मोहन भागवत यांची ट्विटरवरील एन्ट्री म्हणजे संघानं उचललेलं एक मोठं पाऊल मानलं जात आहे. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक सुरेश जोशी, सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सुरेश सोनी, कृष्ण गोपाळ, अनिरूद्ध देशपांडे यांचं देखील ट्विटर अकाऊंट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील ट्विट अकाऊंट असून त्याला 13 लाख 10 हजार फॉलोअर्स आहेत. RSSच्या नेत्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटला देखील महत्व प्राप्त झालं आहे.

RTGS आणि NEFTद्वारे Money Transfer बिधनास्त करा; होणार हा फायदा

कुणाला करतात फॉलो

सरसंघचालक मोहन भागवत यांचं ट्विटर अकाईंट व्हेरीफाईड आहे. मोहन भागवत यांनी twitter account सुरू केल्यानंतर RSSच्या अधिकृत हॅन्डलल फॉलो केलं आहे.

का आले भागवत ट्विटरवर

Loading...

सरसंघचालक मोहन भागवत यांना फॉलो करणारा मोठा वर्ग देशात आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी twitter हे चांगलं माध्यम ठरू शकते. त्यामुळे मोहन भागवत यांनी आपलं ट्विटर अकाऊंट सुरू केलं असावी अशी चर्चा रंगली आहे.

सध्या देशातील बराचसा वर्ग हा सोशल मीडियावर असतो. आपली गोष्ट एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर हा प्रभावी ठरत आहे. त्यामुळे मोहन भागवत यांची ट्विटरवरील एन्ट्री देखील तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी संघातील काही नेत्यांसह भाजप नेत्यांचं देखील ट्विटरवर अकाऊंट आहे. त्यामुळे भागवत यांच्या अकाऊंटचं देखील महत्व वाढलं आहे.

#MumbaiRainsLive: मुंबईत कुठे वाहतुक कोंडी तर कुठे पाणी साचलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...