नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत ( Mohan Bhagwat) मंगळवारी सकाळी बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती(Mithun Chakraborty) यांनी भेटण्यासाठी कोलकात्यातील त्यांच्या घरी पोहोचले आहेत. भागवत आणि मिथून यांच्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. याआधी ऑक्टोबर 2019 मध्येहीह भागवत यांनी मिथून यांची भेट घेतली होती.
याशिवाय मिथून ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातही गेले होते. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्प आर्पित करून मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मिथून चक्रवर्तींना तृणमूल काँगेसनं पश्चिम बंगालमधून राज्यसभेतही पाठवलं होतं. मात्र, सदनात सतत अनुपस्थित राहात असल्यानं मिथून यांनी स्वतःचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतरच मिथून यांची भाजपसोबत जवळीक वाढत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RSS, Rss mohan bhagwat