जम्मू, 3 एप्रिल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात परतणार असल्याचं म्हटलं आहे. 1990 च्या दशकात दहशतवाद सुरू झाल्यानंतर स्वतःच्या घरातून पलायन करावं लागलेले काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) लवकरच खोऱ्यात परततील, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला. भागवत यांनी जम्मूमधील नवरेह उत्सवाच्या (Kashmir Navreh Celebration) शेवटच्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काश्मिरी हिंदू (Kashmiri Hindu) समुदायाला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, "मला वाटतं, तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे."
भागवत म्हणाले की, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटानं काश्मीरी पंडितांचं खरे चित्र आणि काश्मीर खोऱ्यातून 1990 च्या दशकात त्यांचे पलायन यांची सत्यकथा सांगितली आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि इतर अभिनीत विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'दि काश्मीर फाइल्स' 11 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देशातील राजकीय स्पेक्ट्रमचं वेगानं ध्रुवीकरण केलं आहे.
We left (Kashmir) because of extremism but when we'll return now, we'll go back as Hindus & 'BharatBhakt' with an assurance of our security and livelihood. We'll live in a way that nobody will dare to displace us: RSS chief Mohan Bhagwat pic.twitter.com/7bZarxFGOX
— ANI (@ANI) April 3, 2022
'काश्मिरी पंडितांनी मायभूमीकडे परतण्याचा संकल्प करावा'
आरएसएस प्रमुख म्हणाले, "आज प्रत्येक भारतीयाला काश्मिरी पंडितांच्या पलायनाचं सत्य माहीत झालं आहे. हीच वेळ आहे, जेव्हा काश्मिरी पंडितांना अशा प्रकारे त्यांच्या घरी परत जावं की, त्यांना भविष्यात पुन्हा तेथून कधीही कुणीही हाकलून लावू शकणार नाही." काश्मिरी पंडितांनी मायदेशी परतण्याचा संकल्प करून शपथ घ्यावी. जेणेकरून, परिस्थिती लवकर बदलू शकेल, असंही ते म्हणाले.
हे वाचा - श्रीनगरचं हे खास मंदिर तब्बल 32 वर्षांनंतर सजलंय, पूजेसाठी जमले काश्मिरी पंडित
'काश्मीर फाइल्सने लोकांना धक्का दिला'
भागवत म्हणाले, "काहीजण या चित्रपटाच्या समर्थनात आहेत. तर, काहीजण याला अर्धसत्य म्हणत आहेत. पण या चित्रपटानं कटू सत्य जगासमोर मांडून लोकांना धक्का दिला आहे, असं या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे. काश्मिरी पंडितांना कोणीही तेथून निघून जाण्यास भाग पाडू शकत नाही. जर कोणी तसं करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.