S M L

भीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती

मा कोरेगाव प्रकरणाचा बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी निषेध केलाय.

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2018 10:47 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती

02 जानेवारी : भीमा कोरेगाव प्रकरणाचा बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निषेध केलाय. या प्रकरणामागे संघ आणि भाजपचा हात असल्याचा आरोप मायावतींनी केला.

भीमा कोरेगावमध्ये घडलेली घटना थांबवता आली असती. इथं वाद होणार यांची माहिती सरकारला होती त्यांनी तसा बंदोबस्त करायला हवा होता पण फडणवीस सरकारने जाणूनबुजून असं केलं नाही असा आरोपही मायवतींनी केला. भाजपला हा वाद चिघळू द्यायचा होता म्हणूनच त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या हिंसाचारामध्ये भाजपचाच आणि जातीयवादी तत्त्वांचा हात आहे असा आरोपही त्यांनी केला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 10:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close