मोदी सरकारकडून तीन वर्षात जाहिरातींवर 37,54,06,23,616 रुपये खर्च !

एप्रिल 2014 पासून मोदी सरकारने वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, होर्डिंग इतर ठिकाणी केलेल्या जाहिरातबाजीवर एकूण 37,54,06,23,616 इतका खर्च केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2017 06:03 PM IST

मोदी सरकारकडून तीन वर्षात जाहिरातींवर 37,54,06,23,616 रुपये खर्च !

09 डिसेंबर : मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून जाहिरातींवर तब्बल 3 हजार 754 कोटी खर्च केल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

ग्रेटर नोएडा भागातील आरटीआय कार्यकर्ते रामवीर तन्वर यांनी माहितीच्या अधिकारातून मागितलेल्या माहितीमध्ये ही बाबसमोर आली आहे. एप्रिल 2014 पासून मोदी सरकारने वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, होर्डिंग इतर ठिकाणी केलेल्या जाहिरातबाजीवर एकूण 37,54,06,23,616 इतका खर्च केलाय.

मोदी सरकारने  वृत्तवाहिन्या, रेडिओ, चित्रपटगृह, दुरदर्शन, इंटरनेट, एसएमएस आणि टीव्हीवर केलेल्या जाहिरातींवर 1,656 कोटी खर्च केले आहे. तर वृत्तपत्रातील जाहिरातींवर मोदी सरकारने  1,698 कोटी खर्च केले आहे.

तसंच आऊटडोअर जाहिराती अर्थात होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, पत्रकं आणि कॅलेंडरवर सरकारने 399 कोटी खर्च केले आहे.

जून 2014 ते आॅगस्ट 2016 या दोन वर्षात पंतप्रधान मोदी यांची इमेज मेकओव्हर करण्यासाठी 1,100 कोटी खर्च केले. तर 'मन की बात' या कार्यक्रमाच्या जाहिरातींसाठी 8.5 कोटी खर्च केले आहे.

Loading...

मोदी सरकराने 1 जून 2014 ते मार्च 2015 पर्यंत 448 कोटी तर एप्रिल 2015 ते मार्च 2016 आणि एप्रिल 2016 ते आॅगस्ट 2016 या  वर्षात अनुक्रमे 542 कोटी आणि 120 कोटी रुपये खर्च केले आहे.

तर दुसरीकडे दिल्लीमध्ये आप सरकारने आपल्या योजना दिल्लीकरांपर्यंत पोहचवण्यासाठी 2015 मध्ये जाहिरातींवर 526 कोटी खर्च केले होते. त्यावेळी काँग्रेस आणि भाजपने आपच्या कारभारावर टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...