• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • नवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना !

नवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना !

अलीकडे 200 रुपयांची नोट प्रसिद्ध कऱण्यात आली. पण या 200 रुपयांच्या नोटेसाठीही एटीएममध्ये जागा करावी लागली होती.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 जुलै : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने 100 रुपयांची नवी नोट प्रसिद्ध केली आहे. पण या नव्या नोटेला एटीएममध्ये जागा करण्यासाठी एटीएम तयार करणाऱ्या कंपन्यांना तब्बल 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. नवीने नोटेचा आकार हा सध्याच्या 100 रुपयांच्या नोटेपेक्षा वेगळा आहे त्यामुळे एटीएममध्ये तिची जागा करावी लागणार आहे. देशभरात 2.4 लाख एटीएम मशीन आहे यात रिकॅलिब्रेट करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. 'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त ! अलीकडे 200 रुपयांची नोट प्रसिद्ध कऱण्यात आली. पण या 200 रुपयांच्या नोटेसाठीही एटीएममध्ये जागा करावी लागली होती. अजूनही या नोटेसाठी देशातील सर्वच एटीएममध्ये काम पूर्ण झाले नाही तेच 100 रुपयांची नवी नोट चलनात आलीये. रिझर्व्ह बँकेनं नव्या 100 रुपयांची नवी नोट तर जाहीर केली पण एटीएममध्ये ही नोट बाहेर येण्यास एका वर्षाचा कालावधी लागू शकतो. अशी असेल 100 ची नोट ! दोन हजार, पाचशे, दोनशे, पन्नस आणि दहा रुपयाच्या नोटेनंतर आता रिजर्व बँकेने शंभराची नवी नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतलाय. नवी शंभराची नोट ही फिक्कट जांभळ्या रंगाची राहणार असून, त्यावर गुजरातमधील ‘रानी की बाव’ या ऐतिहासिक स्थळाची झलक पहावयास मिळेल. नव्या नोटांसोबत शंभराच्या जुन्या नोटासुद्धा चलनात राहणार असल्याचे रिजर्व बँकेने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. मैसुरच्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये दोन हजाराच्या नोटांची छपाई झाली होती, त्याच प्रेसमध्ये या शंभरीला अंतिम स्वरुप देण्यात आलं असून, ती 10 रुपयाच्या नोटेपेक्षा थोडी मोठी राहणार असल्याचे एएनआयने स्पष्ट केलंय.
    First published: