मराठी बातम्या /बातम्या /देश /

गरजुंच्या मदतीसाठी 24 तास तैनात! रेल्वे ट्रॅकजवळ राहणाऱ्या गरीबांसाठी मास्क बनवतयं RPF जवानाचं कुटुंब

गरजुंच्या मदतीसाठी 24 तास तैनात! रेल्वे ट्रॅकजवळ राहणाऱ्या गरीबांसाठी मास्क बनवतयं RPF जवानाचं कुटुंब

RPF जवान केवळ गरजुंना मास्कच नाही तर त्यांना जेवणही पुरवित आहे.

RPF जवान केवळ गरजुंना मास्कच नाही तर त्यांना जेवणही पुरवित आहे.

RPF जवान केवळ गरजुंना मास्कच नाही तर त्यांना जेवणही पुरवित आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी रेल्वे सध्या बंद असली तरी याची सुरक्षा करणारे जवान लोकहितासाठी तैनात आहेत. केवळ जवानच नाही तर जवानांची पत्नीदेखील या लढ्यात पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. हा जवान ड्यूटीच्या तासाला ट्रेनचे डबे आणि स्टेशन परिसरची सुरक्षा करतो आणि ड्यूटी संपताच गरजुंच्या मदतीसाठी काम करतो.

आरपीएफचे (RPF) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरपीएफचे जवान रेल्वे स्टेशनवर ड्यूटी करतात आणि घरात यांच्या पत्नी मास्क शिवून गरजुंना सहकार्य करतात. हे मास्क आरपीएफसह गरजुंना वाटप केले जातात. याव्यतिरिक्त जवानांच्या कुटुंबाद्वारे तयार केलेले जेवण गरजूंपर्यंत पोहोचविले जाते. आरपीएफचा प्रत्येक जवान आपली प्राथमिक जबाबदारींसह सामाजिक जबाबदारीचे पालन करीत आहेत. गरीब आणि गरजुंसाठी जेवणासह आवश्यक वस्तूही पोहोचविल्या जात आहे.

रेल्वे ट्रॅकवर राहणाऱ्या गरजुंना केली जात आहे मदत

आरपीएफचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे स्टेशनच्या परिसरात असे कुटुंबीय आहेत जे तेथे झोपडपट्टी बनवून राहतात. सर्वसाधारणपणे मजुरी करुन हे लोक आपली गुजराण करतात. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. त्यांना दोन वेळचं जेवण मिळणं अवघड झालं आहे. यासाठी आरपीएफचे जवान पुढे आले आहेत. जवान त्यांना मास्क, हॅडसॅनिटायझर, साबण उपलब्ध करुन देत आहेत. तर त्यांना जेवणही उपलब्ध केले जात आहे.

संबंधित -2 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू, चिंता वाढली

आता या शहराला घोषित केलं कोरोनाचं हॉटस्पॉट, अत्यावश्यक सेवाही बंद

मुंबईत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, 3585 व्यक्तींच्या चाचणीत 5 जणं बाधित

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

First published: