26/11च्या खटल्यात मुलीनं साक्ष दिली म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत

26/11च्या खटल्यात मुलीनं साक्ष दिली म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत

26/11 हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाबविरोधात साक्ष दिली म्हणून मूळच्या राजस्थानच्या एका कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं. त्यांचं जीणं नकोसं झालं. रोटवान कुटुंबाला गाव साडून मुंबईत स्थालांतरित व्हावं लागलं.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, 26 नोव्हेंबर : 26/11 हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाबविरोधात साक्ष दिली म्हणून मूळच्या राजस्थानच्या एका कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं. त्यांचं जीणं नकोसं झालं. रोटवान कुटुंबाला गाव साडून मुंबईत स्थालांतरित व्हावं लागलं.

साक्ष दिली म्हणून वाळीत टाकले

साक्ष दिली म्हणून आई गेल्याचं कळवलं नाही !

साक्ष दिली म्हणून बेरोजगारी

हा अन्याय कशासाठी ?

कसाबविरोधात साक्ष देणं गुन्हा आहे का ?

दहशतवादाविरोधात उभं राहणं पाप आहे ?

26/11च्या खटल्यात अजमल कसाबविरोधात साक्ष दिली म्हणून राजस्थानच्या रोटवान कुटुंबाला चक्क वाळीत टाकलं. हल्ला झाला तेव्हा हे कुटुंब सीएसएमटी स्थानकावर होतं. देविका नटवरलाल रोटवान तेव्हा अवघ्या ९ वर्षांची होती. इतक्या लहान वयातही तिनं कसाबविरोधात साक्ष दिली. तिचं कौतुक करायचं सोडून तिला आणि तिच्या कुटुंबावर संपूर्ण परिवार आणि गावानं बहिष्कार टाकला. पण तुमच्या मुलीच्या साक्षीमुळे संपूर्ण गाव धोक्यात आलंय, पाकिस्तानमधून दहशतवादी येतील आणि आम्हाला मारून टाकतील, असा भ्याड आणि मूर्खपणाचा विचार गावकऱ्यांच्या मनात आला आणि त्यांनी कुटुंबाला वाळीत टाकलं. त्यांच्याशी कुणीच व्यवहार करेना. नटवरलालना काम मिळेना. शेवटी त्यांना गाशा गुंडाळून मुंबईत स्थायिक व्हावं लागलं.

३ वर्षांपूर्वी नटवरलाल यांच्या आईचं निधन झालं. नटवरलाल यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आई गेल्याचं कळवलंही नाही. आता ४ डिसेंबरला कुटुंबात लग्न आहे. पण त्यांना कुणीही निमंत्रण पाठवलेलं नाही. एवढंच नाही तर हल्लानंतर त्यांना लोकप्रतिनिधींनी अनेक आश्वासनं दिली. अपेक्षेप्रमाणे त्याचंही पुढे काहीच झालं नाही.

समाजानं यांच्या पाठीशी उभं रहायला हवं, पण सध्या तसं चित्र नाहीये. पण न्यूज१८ लोकमत रोटवान कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभं आहे.

First published: November 26, 2017, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading