Home /News /national /

70 फुटावरून कोसळली कॅप्सूल लिफ्ट, उद्योगपती, मुलगी, जावयासह सहा ठार

70 फुटावरून कोसळली कॅप्सूल लिफ्ट, उद्योगपती, मुलगी, जावयासह सहा ठार

टॉवरवर बसवलेल्या कॅप्सूल लिफ्ट लिफ्ट 70 फूटावरून कोसळून उद्योगपतीसह सहा जण ठार झाले आहेत.

    इंदूर, 1 जानेवारी: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल यांच्या पातालपानी येथील फार्म हाऊसवर थर्टी फस्टच्या पार्टीत स्मशान शांतता पसरली आहे. पुनीत अग्रवाल पत्नी, मुलगी, जावई, नातू आणि मुंबईत राहणाऱ्या तीन नातेवाईकांसह आपल्या फार्महाऊसवर गेले होते. येथे बनलेल्या टॉवरवर बसवलेल्या कॅप्सूल लिफ्टने सर्व खाली उतरत असताना लिफ्ट 70 फूट ऊंचीवरून खाली कोसळली.सर्व खाली फेकले गेले. या दुर्घटनेत 53 वर्षीय उद्योगपती पुनीत, 27 वर्षीय मुलगी पलक, 28 वर्षीय जावई पलकेश अग्रवाल, 3 वर्षीय नातू नव, मुंबईत राहणारे पलकेश यांचे 40 वर्षीय मेहुणे गौरव आणि 11 वर्षीय मुलगा आर्यवीर या सहा जणांचा झाला. गौरव यांची पत्नी निधी गंभीर जखमी आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांला ही दुर्दैवी घटना घडली. महू एएसपी धर्मराज सिंह मीणा यांनी दिलेली माहिती अशी की, पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल आपली मुलगी आणि जावयासोबर फार्म हाऊसवर थर्टीफस्तनिमित्त पिकनिक करण्यासाठी आले होते. सायंकाळचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी उद्योगपती पुनीत अग्रवाल यांच्यासह सात जण फार्म हाऊस परिसरात उभारण्यात आलेल्या टॉवरवर कॅप्सूल लिफ्टने गेले होते. मात्र, उतरताना लिफ्ट 70 फूट ऊंचीवरून जमिनीवर कोसळली. सर्व जण फुटबॉल सारखे खाली फेकली गेले. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. सगळ्यांना तातडीने अॅम्ब्युलन्सने महू येथील मेवाडा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. नंतर सगळ्यांना चोइथराम हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. पुनीत अग्रवाल यांच्यासह मुलगी, जावयासह 6 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फार्म हाऊसचा चौकीदार कैलाश हा लिफ्ट रिमोटने ऑपरेट करत होता. घटना घडली तेव्हा पुनीत यांचा मुलगा निपुन हा टॉवरवरच थांबला होता. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. पुनीत अग्रवाल यांची सून गरोदर असल्याने ती घरी होती. महू बंदची हाक... या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महू येथे बंदची हाक देण्यात आली आहे. पुनीत अग्रवाल यांच्या जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे इंदूर ते मुंबईपर्यंत त्यांचा मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे. पुनीत अग्रवाल यांचा लाॅन टेनिसची आवड होती. ते विंबलडन पाहण्यासाठी लंडनला जात होते. डेली कॉलेजमध्ये आयोजित मध्यप्रदेश स्टेट रॅंकिंग मेन डबल्स टेनिस स्पर्धेत ते सहभागी झाले होते. पातालपानी येथील आपल्या फॉर्म हाऊसमध्ये त्यांनी खास टेनिस कोर्ट देखील बनवले होते.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या