मराठी बातम्या /बातम्या /देश /#PGStory : हॉस्टेलच्या दिवसांत मला औषधांसोबत बिअर द्यायचे रुममेट

#PGStory : हॉस्टेलच्या दिवसांत मला औषधांसोबत बिअर द्यायचे रुममेट

हाॅस्टेलच्या दिवसांची बातचं निराळी असते. मित्र-मैत्रिणींसोबत कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा, भांडणं, कधी अभ्यास तर कधी अभ्यासासोबत केलेल्या पार्ट्या सर्वच अविस्मरणीय असतं

हाॅस्टेलच्या दिवसांची बातचं निराळी असते. मित्र-मैत्रिणींसोबत कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा, भांडणं, कधी अभ्यास तर कधी अभ्यासासोबत केलेल्या पार्ट्या सर्वच अविस्मरणीय असतं

हाॅस्टेलच्या दिवसांची बातचं निराळी असते. मित्र-मैत्रिणींसोबत कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा, भांडणं, कधी अभ्यास तर कधी अभ्यासासोबत केलेल्या पार्ट्या सर्वच अविस्मरणीय असतं

मुंबई, 8 मे : शिक्षण अथवा कामासाठी घराबाहेर एखाद्या पीजीमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं म्हणतात. तो तुम्हाला अनुभवसंपन्न तर बनवतोच शिवाय ह्रदयाशी जोडणारी नाती मिळवून देतो. सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिमित्ताने शिक्षण वा कामाच्या निमित्ताने घराबाहेर एखादं हॉस्टेल वा पीजीमधील (#PGStory) आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

ही कहाणी आहे सुशील कनौजीयाची. सुशील व्यवसायाने इंजिनिअर. सध्या पुण्यात नोकरी करतो. त्यांचं शिक्षण, इंटर्नशिप दिल्लीत झालंय. पहिल्या नोकरीचा अनुभवही त्याला दिल्लीतच मिळाला. दिल्ली ते पुण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अत्यंत रोमांचकारी होता.

आता नोकरी करीत असल्याने आयुष्य बदलून गेलंय. प्रत्येक वेळी ऑफिस आणि येथील टार्गेटचं टेन्शन असतं. तसं अभ्यास करणं काही सोपं नव्हतं. मात्र तेव्हाची बातचं काही निराळी होती. हॉस्टेलचे दिवस हे माझ्या आयुष्यात सोनेरी दिवस होते. तेव्हा मी दिल्लीतून बीटेक करीत होतो. यादरम्यान मी हॉस्टेलमध्ये राहत होतो. यावेळी आकाश, विपिन, राहुल आणि मी असे आम्ही चौघंजणं रुम शेअर करायचो. पहिल्या सेमिस्टरपर्यंत आमच्या मैत्रीची भट्टी चांगली जमली होती. अभ्यासबरोबरच आम्ही खूप मजा-मस्ती करायचो.

त्या दिवशी माझी तब्येत बरी नव्हती. तापाने फणफणलो होतो. कॉलेजलाही जाऊ शकत नव्हतो. म्हणून मी आकाश आणि विपिनला सांगितलं की कॉलेजमधून येताना माझ्यासाठी औषध घेऊन या. काही तासांनी ते रुमवर आले. पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. मी त्यांना विचारलं औषधं कुठंय? यावर त्यांनीच मला विचारलं कोणतं औषध? खूप वेळ त्रास दिल्यानंतर त्यांनी मला औषध दिलं. त्यानंतर मी पाणी आणायला सांगितलं. मात्र माझ्या मित्रांनी समोर बिअरची बाटली आणून ठेवली. मी म्हटलं त्यांना की मला पाणी द्या औषधं घ्यायचंय. तर ते मलाच  समाजवायला लागले की, औषधं बिअरसोबत घेतल्याने जास्त परिणामकारक असते. मी हातात औषध घेऊन बिअरच्या बाटलीकडे बघत राहिलो. त्यांची जबरदस्ती सुरूच होती. तसं आम्ही नियमित रुमवर दारू पित नाही. पण केव्हातरी लपून-छपून आमची दारू पार्टी व्हायची. मी गटागटा बिअरची बाटली संपवली. आयुष्यात पहिल्यांदा मी औषधांसोबत बिअर प्यायलो होतो. आजही जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा हा किस्सा आठवून पोट धरून हसतो.

हे वाचा -आठशे खिडक्या नऊशे दारं! लॉकडाऊनमध्ये शूट केली नवी मालिका, पाहा VIDEO

अख्ख्या कुटुंबाने घेतलं देशसेवेचं व्रत; कोरोना योद्ध्यांच्या कर्तृत्वाला सलाम

First published:
top videos

    Tags: Delhi