राम रहिमच्या समर्थकांमुळे पोलिसांचे धाबे दणाणले; वाचा काय आहे प्रकरण!

Baba Ram Rahimनं आपला पॅरोल अर्ज मागे घेतला आहे. पण, त्याच्या समर्थकांची गर्दी मात्र तुरूंगपरिसरात वाढताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 02:56 PM IST

राम रहिमच्या समर्थकांमुळे पोलिसांचे धाबे दणाणले; वाचा काय आहे प्रकरण!

रोहतक; 02 जुलै : बाबा राम रहिमच्या समर्थकांमुळे आता रोहतक पोलिसांची डोकेदु:खी वाढताना दिसत आहेत. कारण, बाबा राम रहिमनं शेती करण्यासाठी 42 दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला होता. पण, त्यानं तो नंतर मागे देखील घेतला. बाबा राम रहिमच्या पॅरोलवरून हरियाणामध्ये राजकीय वादावादी देखील समोर आली होती. त्यानंतर देखील बाबा राम रहिमचे भक्त आता तुरूंग परिसरामध्ये गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी  तुरूंगाच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ केली आहे. शिवाय, तुरूंगाच्या परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीला देखील बंदी केली आहे. तुरूंगाच्या आसपास असलेल्या झाडांवर, झुडुपांमध्ये हे समर्थक बसून राहत आहेत. मुख्य म्हणजे स्वत:ला मुलाखतकार आणि पत्रकार असं सांगत हे समर्थक तुरूंगात देखील घुसण्याचा प्रयत्न करतात. लैंगिक शोषण आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहिम सध्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. त्यानंतर त्यानं पॅरोलसाठी अर्ज देखील केला होता. तो आता मागे घेतला आहे. पण, समर्थकांची गर्दी मात्र होताना दिसत आहे.

ढाबा परिसरात करतात बाईक पार्क

बाबा राम रहिमचे समर्थक तुरूंगापासून जवळ असलेल्या ढाबा जवळ आपल्या गाड्या पार्क करतात. त्यानंतर ते तुरूंगाकडे येतात. पण, पोलीस आता सतर्क झाले असून त्यांची नजर ही बाबा राम रहिमच्या समर्थकांवर आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमला बलात्कार प्रकरणात 2017मध्ये 20 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2002 मध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहीमने आपल्याच डेऱ्यातील दोन साध्वींवर तब्बल 3 वर्षं अत्याचार केले. या प्रकरणी दोन साध्वींनी कोर्टात धाव घेतली. तब्बल 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पंचकुला सीबीआय कोर्टाने राम रहिमविरोधातली याचिका निकाली काढली होती. शिवाय, पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात देखील राम रहिम दोषी ठरला आहे.

VIDEO: घरचा वाद चव्हाट्यावर, भररस्त्यात दोन भावांमध्ये तुंबळ मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...