'जैश ए मोहम्मद'ची धमकी, मुंबईसह 11 रेल्वे स्टेशन्स आणि 6 राज्यातली मंदिरं उडवण्याची धमकी

'जैश ए मोहम्मद'ची धमकी, मुंबईसह 11 रेल्वे स्टेशन्स आणि 6 राज्यातली मंदिरं उडवण्याची धमकी

8 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हे स्फोट घडवून आणण्यात येतील असंही 'जैश ए मोहम्मद'ने धमकीच्या पत्रात म्हटलं आहे.

  • Share this:

रोहतक 15 सप्टेंबर : पाकिस्तानच्या मदतीवर कारवाया घडवून आणणारी दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'नं मुंबईसह देशातल्या विविध राज्यांमध्ये घातपाती कारवाया करण्याची धमकी दिलीय. अशी धमकी देणारं पत्र पाकिस्तानातून हरियाणातल्या रोहतक रेल्वे जंक्शन (Rohtak Junction) च्या अधिक्षकांना मिळाल्याने खळबळ उडालीय. जैश (Jaish-e-Mohammed) ने या पत्रात मुंबईसह 6 राज्यांमधली महत्त्वाची मंदिरं स्फोटांनी उडवून देण्याची धमकी दिलीय. मसूद अहमद याच्या नावाने ते पत्र असून त्याने स्वत:ला जम्मू आणि काश्मीरचा एरिया कमांडर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून सुरक्षा संस्था त्याचा आणखी तपास करत आहेत. 8 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हे स्फोट घडवून आणण्यात येतील असंही या पत्रात म्हटलं आहे.

VIDEO या मंत्र्यांना जरा आवारा! 'रोजगार आहेत, मात्र लोकच शिकलेले नाहीत'

या पत्रात मुंबई, रोहतक जंक्शन, रेवाडी, हिसार, कुरुक्षेत्र,  बंगळुरु, चेन्नई, जयपुर, भोपाल, कोटा आणि इटारसी रेल्वे स्टेशन आणि   राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधली महत्त्वाची मंदिरं उडविण्याची धमकी दिली आहे. या पत्रानंतर सुरक्षा संस्थांनी संबंधीत सर्व विभागांना सावध राहण्याच्या सूचना केल्याआहेत. त्याचबरोबर रेल्वे आणि महत्त्वांच्या इमारतींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलीय.

...तर पाकिस्तानचा युद्धात परभाव - इम्रान खान

काश्मीर मधून 370 कलम हटविल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारतावर सातत्याने तोंडसुख घेताहेत. युद्धाची धमकी देणं, अणुयुद्धाचा वारंवार उल्लेख करणं असं करून ते जगाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांनकडे सर्व जगानं दुर्लक्ष केलंय. त्यामुळे इम्रान खान यांचा अधीकच जळफळाट होतोय. अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतावर आगपाखड करत असतानाच पारंपरिक युद्ध झाल्यास पाकिस्तान भारतासोबत जिंकू शकणार नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलीय. इम्रान खान म्हणाले, आम्हाला युद्ध नकोय.

गोदावरी नदीत पर्यटकांची बोट बुडाली; 13 मृतदेह सापडले, 23 जण बेपत्ता

आम्ही कधीही पहिले अणुयुद्ध सुरू करणार नाही. मी शांततेचा पुरस्कर्ता आहे. युध्दाने कधीही प्रश्न सुटत नाहीत आणि कुणाचं भलं झालं नाही. पण पारंपरिक युद्ध झालंच तर त्यात पाकिस्तानचा परभव होत असेल तर आमच्या समोर दोन पर्याय उतरतील. एक म्हणजे आत्मसमर्पण करणं आणि दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढणं. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचे परिणाम हे अतिशय भयानक असतात असं म्हणत त्यांनी अणुयुद्धाची धमकीही दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 09:25 PM IST

ताज्या बातम्या