बायकोला भेटण्यासाठी पेरोलवर बाहेर आला, तिलाच संपवून स्वत:लाही लावला गळाफास!

बायकोला भेटण्यासाठी पेरोलवर बाहेर आला, तिलाच संपवून स्वत:लाही लावला गळाफास!

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली. मृतक पती खून प्रकरणात गेली अनेक वर्षे तुरूंगात होता.

  • Share this:

रोहतक (हरियाणा), 23 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने पत्नीची हत्यात केली आहे. बरं इतकंच नाही तर पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत:लाही ठार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली. मृतक पती खून प्रकरणात गेली अनेक वर्षे तुरूंगात होता.

रोहतक जिल्ह्यात हे हृदय विदारक प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील रामगोपाल कॉलनीमध्ये हा प्रकार घडला आहे. मृत आरोपीच्या नवऱ्याचे नाव समुन्द्र हुड्डा असून तो माजी सैनिक होता. त्यांची पत्नी कृष्णा गृहिणी होती. आरोपी हा काही दिवसांपूर्वी तुरूंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. 27 सप्टेंबर रोजी तो तुरूंगात परतणार होता. तुरूंगात जाण्यापूर्वी आरोपींनी ही घटना घडवून आणली आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांचाही मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आरोपीने असं का केलं याचाही पोलीस आता कसून तपास करत आहे. दरम्यान, बुलढाण्यात आईसह 4 मुलींचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे.

इतर बातम्या - नारायण राणेंना पुन्हा धक्का, आजचा भाजप प्रवेश रद्द!

बुलढाण्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आईसह 4 मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गावाच्या एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढलले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा तर त्यासोबत 4 चिमुकल्यांचा मृतदेह आढळला आहे. मृतांमध्ये आई आणि 4 मुली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आई उज्वला ढोके वय 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष , पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

इतर बातम्या - युतीच्या चर्चेवर भाजपचा हट्टीपणा कायम, शिवसेनेचा 'हा' फॉर्म्युला अमान्यच!

या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.

VIDEO: शिवच्या आईवर वीणाची जादू...सांगितला पुरणपोळीचा किस्सा

Published by: Renuka Dhaybar
First published: September 23, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading