संतापजनक ! चाकूचा धाक दाखवून पतीला डांबलं, पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

संतापजनक ! चाकूचा धाक दाखवून पतीला डांबलं, पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत पत्नीला रस्त्याच्या शेजारी घेऊन येण्यास सांगितलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

  • Share this:

चंदीगड, 31 मार्च : चाकूचा धाक दाखवून तीन नराधमांनी पतीसमोरच त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नाही तर या दाम्पत्याला बेदम मारहाणदेखील करण्यात आली. हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळावर धाव घेत चौकशी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित महिलेनं आरोपींविरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. जेणेकरुन भविष्यात अशा घटना वारंवार घडणार नाहीत.

शनिवारी (30 मार्च) रात्री जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास पीडित दाम्पत्य बाईकवरुन खरखौदाच्या दिशेनं प्रवास करत होते. यादरम्यान, तीन बाईकस्वारांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. जेव्हा हे दाम्पत्य हसनगडजवळ पोहोचले, तेव्हा या नराधमांनी त्यांना रोखलं. यानंतर या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला. आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत पत्नीला रस्त्याच्या शेजारी घेऊन येण्यास सांगितलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यास महिलेच्या पतीनं विरोध करण्यास केला तेव्हा आरोपींनी या दाम्पत्याला बेदम मारहाण केली आणि हत्येची धमकी देत तिघंही तेथून फरार झाले.

यानंतर, जखमी अवस्थेत या दाम्पत्यानं कसेबसे पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली तक्रार नोंदवली. पीडित महिलेची परिस्थिती पाहता पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.  यानंतर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत घटनेची चौकशी केली. डीएसपी नरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या घटनेशी संबंधित आरोपींची माहिती मिळाली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे.

वाचा अन्य बातम्या

राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

टिकटिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामतीतील सभेचं काऊंटडाऊन सुरू

दहावर्षांपूर्वी कारवाई झाली असती तर पुलवामा घडलं नसतं - अमित शहा

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

First Published: Mar 31, 2019 09:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading