Home /News /national /

धक्कादायक! महिला डॉक्टरनं गळफास लावून केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं...

धक्कादायक! महिला डॉक्टरनं गळफास लावून केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं...

डॉक्टर इंटर्नच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाहीत. मात्र, तपास पथकाला खोलीतून एक सुसाइड नोट सापडली आहे.

    रोहतक, 03 जून : देशात कोरोनाव्हायरसचे संकट असताना फ्रंट लाइनवर काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. यातच रोहतकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. PGI येथील बीडीएस इंटर्न डॉक्टरनं मंगळवारी संध्याकाळी वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. कनिका सेठी असे या डॉक्टरचं नाव असून त्या पानीपतच्या रहिवासी होत्या. PGI रोहतक येथून बीडीएस करत होती. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सध्या डॉक्टर इंटर्नच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाहीत. मात्र, तपास पथकाला खोलीतून एक सुसाइड नोट सापडली आहे. कनिकाने वसतिगृहाच्या खोली क्रमांक 144 मध्ये गळफास लावून घेतला. असे सांगण्यात येत आहे की, कनिकाने खोलीतील पंख्याला ओडणी बांधून आत्महत्या केली. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पीजीआय एसएचओ आणि एफएसएल तज्ज्ञ डॉ. सरोज दहिया यांचे पथकही घटनास्थळी बोलावले होते. डॉक्टर सरोज दहिया यांच्या टीमने घटनास्थळाची बारीक तपासणी केली. सुमारे एक वर्षापूर्वी ओंकार नावाच्या डॉक्टरने अशाच वसतिगृहात आत्महत्या केली होती आणि पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. पोलिसांना सापडली सुसाइड नोट वसतिगृहातील खोलीत पोलिसांना सुसाइड नोटही सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाइड नोट इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे. त्यात असे लिहिले आहे, 'मला आई आणि वडील खूप आवडतात. मी फेब्रुवारीपासून खूप अस्वस्थ आहे आणि मी माझ्या मृत्यूला जबाबदार आहे. मात्र कनिकानं सुसाइड नोटमध्ये आत्महत्या करण्याचे कारण सांगितले नाही. रोहतकचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बुरा यांनी सांगितले की, पोलिसांना सायंकाळी पाचच्या सुमारास माहिती मिळाली होती आणि आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे कुटूंबिय रोहतकला आले नाही आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Rohtak, Suicide news

    पुढील बातम्या