रोहित तिवारी हत्याप्रकरणात आईकडून नवा खुलासा

रोहित तिवारी हत्याप्रकरणात आईकडून नवा खुलासा

रोहित तिवारींची हत्या एखाद्या सिनेमाच्या कहाणी प्रमाणेच रचण्यात आल्याचं दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी आता रोहित यांच्या आई उज्ज्वला यांच्याकडून नवा खुलासा करण्यात आला आहे. उज्ज्वला तिवारी म्हणाल्या की, 'मी आधीच रोहितला त्याच्या पत्नीच्या वागणुकीबाबत सावध केलं होतं. पण रोहित हे सगळं प्रकरणातून मार्ग काढण्याची रोहितची इच्छा होती. पण माझ्यासोबत त्याचे असणारे चांगले संबंध अपूर्वाला पाहावत नव्हते.'

रोहित तिवारींची हत्या एखाद्या सिनेमाच्या कहाणी प्रमाणंच रचण्यात आल्याचं दिसत आहे. रोहित तिवारी यांची हत्या दुसरे-तिसरे कोणी नाही तर त्यांची पत्नी अपूर्वानंच केली आहे. अपूर्वा तिवारीनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीदेखील दिलेली नाही.

या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आणि अपूर्वाच्या नातेसंबंध गेल्या काही दिवसांमध्ये ताणले गेले होते आणि यामुळे दोघांचे प्रचंड वाददेखील सुरू होते.

ज्या दिवशी रोहित यांच्या हत्येचा कट रचण्यात आला त्यावेळेस ते नशेत होते. यादरम्यानच अपूर्वानं उशीच्या मदतीनं त्यांचं तोंड दाबलं आणि त्यांचा जीव घेतला. यानंतर तिनं पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो फसला. अपूर्वाकडून गुन्हा मान्य करून घेणं पोलिसांसाठी सोपं काम नव्हतं.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'अपूर्वानं अनेकदा वेगवेगळी विधानं करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर आपल्या वैवाहिक आयुष्यातील समस्या सांगण्यात सुरुवात केली. तिचं वैवाहिक आयुष्य चांगलं नव्हतं. तिच्या महत्त्वाकांक्षा- इच्छा पूर्ण होत नव्हत्या. याचा राग तिनं पतीचीच हत्या करून काढला.'

VIDEO : साध्वींचं कौतुक करताना भाजप खासदाराचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य

First published: April 26, 2019, 11:54 AM IST

ताज्या बातम्या