नवी दिल्ली 18 जुलै : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित याच्या हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचने अखेर आरोपपत्र दाखल केलंय. रोहिल याची पत्नी अपूर्वानेच ही हत्या केल्याची पोलिसांचा आरोप आहे. क्राईम ब्रांचने आज कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं.
एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नी अपूर्वा शुक्लाला एप्रिल महिन्यात अटक केली होती. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अपूर्वाची तब्बल 8 तास चौकशी केली होती. पण, या हत्या प्रकरणामध्ये पत्नी अपूर्वापर्यंत पोहोचण्यासाठी एका टिशू पेपरनं मदत केली. विश्वास नाही ना बसत? पण, एका टिशू पेपरमुळे रोहित तिवारी हत्या प्रकरणात पत्नीचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. एखाद्या चित्रपटातील सीनला शोभावी अशीच हे सर्व प्रकरण होतं.
Rohit Shekhar murder case: Crime Branch has filed a charge sheet against his wife Apoorva. Rohit Shekhar was the son of former Uttarakhand & Uttar Pradesh Chief Minister ND Tiwari. pic.twitter.com/XHatIj75g3
— ANI (@ANI) July 18, 2019
टिशू पेपर आणि आरोपी
रोहित तिवारीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. जवळपास पाच दिवस पोलिस सर्व शक्यतांवर तपास करत होती. यावेळी संशयाची सुई ही कुटुंबातील व्यक्तिवर येऊन थांबत होती. दरम्यानच्या काळात पोलिसांनी रोहितच्या खोलीची झडती घेतली होती. त्यावेळी सापडलेल्या टिशू पेपरनं सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या.
कारण, त्या टिशू पेपरवर रक्ताचे डाग होते. पोलिसांनी हे टिशू पेपर ताब्यात घेत फॉरेन्सिक टीमची मदत घेतली. यावेळी रोहितच्या रूममध्ये कुणीतरी होतं जे सतत रक्त साफ करत होतं. यानंतर पोलिसांचा संशय पत्नी अपूर्वावर बळावला. त्यानंतर तपास करत पत्नीला ताब्यात घेण्यात आलं.
पोस्टमॉर्टम अहवाल
दुसरीकडे, रोहित यांचा मृत्यू नैसर्गिक नसून नाक, तोंड आणि गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती पोस्टमार्टेम अहवालात समोर आली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.