मराठी बातम्या /बातम्या /देश /1 कोटींची स्कॉलरशीप, Phd साठी जिनेव्हाला गेलेल्या लेकीने जगाला दाखवला भारताचा खरा चेहरा

1 कोटींची स्कॉलरशीप, Phd साठी जिनेव्हाला गेलेल्या लेकीने जगाला दाखवला भारताचा खरा चेहरा

या तरुणीला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलण्याची संधी मिळाली होती.

या तरुणीला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलण्याची संधी मिळाली होती.

या तरुणीला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलण्याची संधी मिळाली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 मार्च : भारतात दलितांची स्थिती ही पाकसारख्या शेजारील देशांहून खूप सुकर आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुन देशातील एक दलित तरुण आत्मविश्वासाने आपलं मत मांडत होती. हिचं नाव आहे रोहिणी घावरी. इंदूरची रोहिणी सध्या स्वित्झरलँडमधील जिनेव्हामध्ये पीएचडी करीत आहे. तेथेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 52 वी बैठकही सुरू आहे.

एका सफाई कामगाराच्या लेकीला येथे बोलण्याची संधी मिळाली. एक दलित मुलगी म्हणून इथपर्यंत पोहोचणं तिच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी ती असं काही म्हणाली की, सर्वजण पाहातच राहिले. ती म्हणाली की, आमच्या देशात एक आदिवासी राष्ट्रपती आणि ओबीसी पंतप्रधान आहेत. भारतात राज्यघटना इतकी मजबूत आहे की, मागासवर्गीय व्यक्तीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहू शकतो. याशिवाय तो हार्वर्ड किंवा ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकतो. रोहिणीचं भाषण आहे देशभरातच नाही तर जगभरात चर्चिलं जात आहे. यावेळी रोहिणीने सांगितलं की,  भारत सरकारकडून तिला 1 कोटींची स्कॉलरशीप मिळाली आहे. न्यूज एजन्सी ANI ने आपल्या सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. यानंतर 1 कोटी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

सर्पदंश झालेल्या आईला वाचवण्यासाठी लेकीची धडपड; फिल्ममध्ये पाहिलं तसं सापाचं विष तोंडाने काढलं, शेवटी...

कोण आहे रोहिणी घावरी?

रोहिणी घावरी ट्विटरवर आपली ओळख आंबेडकरवादी म्हणून करते. ती जिनेवामधून पीएचडी करीत आहे. इंदूरची राहणाऱ्या रोहिणीचे वडील सफाई कामगार आहेत. संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व करणं त्याचं स्वप्न होतं. या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी भारतातील दलित समुदायाचं सत्य जगसमोर आणल्याचं म्हटलं जात आहे.

1 कोटी होतोय ट्रेंड...

रोहिणीने ANI शी बोलताना सांगितलं की, भारतात दलितांना आरक्षण मिळतं. त्यांनाही भारत सरकारकडून 1 कोटींची स्कॉलरशीप मिळाली आहे. यानंतर सोशल मीडियावर 1 कोटी ट्रेंड करीत आहे.

First published:
top videos

    Tags: America, Modi Government