रोहिंग्या निर्वासितांचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका-केंद्र सरकार

रोहिंग्या निर्वासितांचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका-केंद्र सरकार

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि आयसीसशीही संबंध आहे. त्याचबरोबर हवाला रॅकेट आणि इतर अनेक बेकायदेशीर घटनांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला आहे

  • Share this:

दिल्ली, 19 सप्टेंबर:म्यानमारमधून पळून आलेल्या आणि भारतात निर्वासित म्हणून राहणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्यांच विधान केंद्र सरकारनं केलंय. तसंच या निर्वासितांचा प्रश्न सरकारवर सोडावा कोर्टाने त्यात हस्तक्षेप करू नये असंही प्रतिपादन केंद्र सरकारने केलंय.

म्यानमारमधल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात आश्रय मिळावा अशी या रोहिंग्यांची इच्छा आहे. या मागणीसाठी भारतात निर्वासित असलेल्या रोहिंग्या निर्वासितांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहिग्यांचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि आयसीसशीही संबंध आहे. त्याचबरोबर हवाला रॅकेट आणि इतर अनेक बेकायदेशीर घटनांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.

आता या प्रकरणावर 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 09:16 AM IST

ताज्या बातम्या