Elec-widget

नारायण मूर्तींचा मुलगा इन्फोसिसचा सीईओ?

नारायण मूर्तींचा मुलगा इन्फोसिसचा सीईओ?

नवीन सीईओला कंपनीचं कल्चर माहित असावं ,त्यांना कंपनीच्या क्लायंट्सच्या समस्यांचा जाण असावी आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्यांशी नवीन सीओची अत्यंत फ्रेंन्डली वागणूक असावी अशी कंपनीची अपेक्षा असल्याचं वेंकटेशन यांनी यावेळी सांगितलं

  • Share this:

18 ऑगस्ट : विशाल सिक्काने इन्फोसिसच्या सीईओ पदावरून राजीनामा दिल्यानंतर आता इन्फोसिसच्या सीईओ पदासाठी नारायण मूर्तींचा मुलगा रोहन मूर्तीचा विचार होणार असल्याची माहिती रवी वेंकटेशन यांनी दिली आहे. रवी वेंकटेशन इन्फोसिसचे को चेअरमन असून सिक्कांनी राजीनामा दिल्यानंतर आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

नवीन सीईओला कंपनीचं कल्चर माहित असावं , त्यांना कंपनीच्या क्लायंट्सच्या समस्यांचा जाण असावी आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्यांशी नवीन सीईओची अत्यंत फ्रेंन्डली वागणूक असावी अशी कंपनीची अपेक्षा असल्याचं वेंकटेशन यांनी यावेळी सांगितलं. यामुळेच नारायण मूर्तींच्या मुलाचा विचार होऊ शकतो.

नवीन सीईओच्या नावावर शिक्कामोर्तब 31 मार्च 2018 पर्यंत होईल. दरम्यान राजीनामा घ्यायचा निर्णय आज सकाळीच घेतला असल्याची माहिती विशाल सिक्का यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2017 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...