प्रचारावेळी भाजप नेत्याचा डान्स व्हायरल, पाहा VIDEO

प्रचारावेळी भाजप नेत्याचा डान्स व्हायरल, पाहा VIDEO

भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक असलेल्या या नेत्याने ट्विटरवरून व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 एप्रिल : निवडणुकीत देशातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपचा चेहरा असलेले आसामचे अर्थमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसाममधील नलबरी येथे भाजपच्या एका रॅलीत त्यांनी तुफान डान्स केला.

प्रचारावेळी मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी नेत्यांकडून अनेक प्रलोभने दाखवली जातात. त्यासाठी अनेक कल्पना लढवल्या जातात. हिमंत शर्मा हे धीरगंभीर स्वभावासाठी ओळखले जातात. यातच त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बरीच चर्चा सुरू आहे.

ट्विटरवर हिमंत यांनी म्हटले आहे की, लोकांसोबत राहण्याचं सुख आणि मस्ती, लोकांसोबत घोषणा देणं, नाचणं यात सहभाग घ्यायला आवडतं. नलबरी येथे रॅलीवेळीचा हा व्हिडिओ आहे. तुम्हा सर्वांचे आभार.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये हिंमत शर्मा यांचे नाव घेतले जाते. याआधीही त्यांनी रॅलीत डॉन्स केला आहे. हिंमत यांनी पुर्वोत्तर भागात भाजपला 25 पैकी 19 जागा मिळतील असं म्हटलं आहे.

VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले

First published: April 10, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading