मराठी बातम्या /बातम्या /देश /

पावसाळ्यातील पर्यटन ठरू शकतं जीवघेणं, प्रवाशांच्या गाड्यांवरच कोसळली दरड, थरकाप उडवणारा Video

पावसाळ्यातील पर्यटन ठरू शकतं जीवघेणं, प्रवाशांच्या गाड्यांवरच कोसळली दरड, थरकाप उडवणारा Video

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 10 जुलै : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अमरनाथ येथे ढगफुटीचं प्रकरण ताजं आहे. हिमाचल प्रदेशातही (Himachal Pradesh) पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना होत असतात. या घटनेचा एक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पर्यटकांच्या गाड्यावर दरड कोसळल्याचं दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशमधील एक स्पॉटवर पंजाबमधील पर्यटकांच्या गाड्या उभ्या होत्या. त्यावेळी डोंगराचा एक मोठा भाग या गाड्यांवर कोसळला. यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणी पर्यटक बसले नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर वाहन चालकांमध्येही भीती पसरली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत घरी सुरक्षित राहणं योग्य आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain update) आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे.
First published:

Tags: Himachal pradesh, Rain fall, Shocking video viral

पुढील बातम्या