'देशाच्या 65 टक्के तरुणांना तुमच्यावर भरवसा', राहुल गांधींना दिलं समर्थन

काँग्रेस पक्ष सध्या नेतृत्वहीन झाला आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी कुणाचंही नाव सुचत नाहीये. या सगळ्या गोंधळात आता प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राहुल गांधींना समर्थन दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 07:34 PM IST

'देशाच्या 65 टक्के तरुणांना तुमच्यावर भरवसा', राहुल गांधींना दिलं समर्थन

नवी दिल्ली, 13 जुलै : काँग्रेस पक्ष सध्या नेतृत्वहीन झाला आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी कुणाचंही नाव सुचत नाहीये. या सगळ्या गोंधळात आता प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राहुल गांधींना समर्थन दिलं आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून राहुल गांधींची प्रशंसा केली आहे. देशसेवा करण्यासाठी कोणत्याही पक्षातल्या पदाची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. राहुल, तुमच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं आहे. आपल्या देशातले 45 टक्के तरुण तुमच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवतात, असंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

'पश्चिम बंगालमध्ये 107 आमदार आमच्या संपर्कात', भाजपचा दावा

राहुल गांधी हे देशातल्या लोकांशी जोडलेले आहेत. त्यांच्या या जनसेवेला कोणत्याही पदवीची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव आणि अमेठीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची नावं घेतली जात आहेत.

प्रियांका गांधींचीही प्रतिक्रिया

राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये म्हणून अनेकांनी त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न केला पण अखेर राहुल गांधी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहिले.

राहुल गांधींच्या राजीनाम्यावर प्रियांका गांधींनीही प्रतिक्रिया दिली आहे. एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस कमी जणांमध्ये असतं. त्यामुळेच राहुल गांधींच्या निर्णयाचा मी मनापासून सन्मान करते, असं त्यांनी म्हटलं आहे.

=================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...