नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : प्रियांका गांधी यांनी सोमवारी लखनऊत रोड शो केला आणि त्यांच्या सक्रिय राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लखनऊतल्या शक्ती प्रदर्शनाच्या आधी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावुक पोस्ट करत प्रियांकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची सेवा करणं हे प्रियांकाचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत असं रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिलं आहे.
रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी होत असताना प्रियांका या त्यांना सोडण्यासाठी ईडीच्या गेटपर्यंत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत मी माझ्या पतीच्या पाठिमागे खंबीरपणे उभी आहे असं सांगितलं होतं. भारतीय कुटुंबात एक स्त्री जे करतं तेच मी करतेय असंही त्या म्हणाल्या होत्या. यावरुन त्यांनी एका खंबीर भारतीय स्त्रीचं दर्शन घडवलं असं राजकीय निरिक्षकांच मत होतं.
#PriyankaEntersPolitics @priyankagandhi 😊👍 pic.twitter.com/9b1DjQZzrN
— Robert Vadra (@irobertvadra) February 11, 2019
आता वाड्रा यांनीही प्रियांकांना आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केलाय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, " उत्तर प्रदेशातल्या नव्या प्रवासाबद्दल आणि भारतीयांच्या सेवेसाठी प्रियांकांना शुभेच्छा. तु माझी चांगली मित्र आणि पत्नी आहेस. आपल्या मुलांची उत्तम आई आहेस. सध्या व्देषाचं आणि कलुषीत राजकीय वातावरण आहे.
मात्र मला माहित आहे की लोकांची सेवा करणं हे तीचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे तीला लोकांच्या हवाली करत आहेत." आता तुम्हीच तीचं रक्षण करा असं आवाहनही त्यांनी लोकांना केलंय.
पेट्रोल मागितल्यावरून भर चौकात तरुणाला भोसकले; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा