राजकीय एंट्रीनंतर प्रियंका गांधींना धक्का की दिलासा? रॉबर्ट वाड्रांची कोर्टात धाव

पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर झालेले विविध आरोप हा प्रियंका यांच्यासाठी अडचणीचा विषय ठरू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2019 09:49 PM IST

राजकीय एंट्रीनंतर प्रियंका गांधींना धक्का की दिलासा? रॉबर्ट वाड्रांची कोर्टात धाव

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : प्रियंका गांधी यांची नुकतीच सक्रीय राजकारणात एंट्री झाली आहे. पण पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर झालेले विविध आरोप हा प्रियंका यांच्यासाठी अडचणीचा विषय ठरू शकतो. रोबर्ड वाड्रा यांनी मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मनोज अरोडा प्रकरणात वाड्रा यांनी हा अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पतियाळा हाऊस कोर्टात उद्या (शनिवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात वाड्रा यांना दिलासा मिळतो का, हे आता पाहावं लागेल.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बहिण प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. पण प्रियांका यांचे पती असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील विविध आरोपांद्वारे विरोधकांकडून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अशातच आता वाड्रा यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.


पाच शिक्षकांकडून विद्यार्थ्याला पट्ट्याने मारहाण, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...