मुरादाबादमधून रॉबर्ट वाड्रा लोकसभा निवडणूक लढणार?

मुरादाबादमधून रॉबर्ट वाड्रा लोकसभा निवडणूक लढणार?

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुरादाबाद, 25 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसनं नवनवीन धक्के द्यायला सुरूवात केली आहे. प्रियांका गांधी - वाड्रा यांच्याकडे उत्तर प्रदेशातील सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रिय करण्यात आल्यानंतर काँग्रेस आणखी एक चाल खेळण्याच्या तयारीत आहे. सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी रॉबर्ड वाड्रा यांनी फेसबुकवरून त्याबाबतचे सुतोवाच केले होते.

दरम्यान, रॉबर्ट वाड्रा आता उत्तर प्रदेशातील मुरादाबामधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, रॉबर्ट वाड्रा यांचे स्वागत करणारे पोस्टर्स आता मुरादाबाद येथे लावण्यात आहेत. यापूर्वी प्रियांका गांधी यांनी देखील भोपाळ, गोरखपूर येथून निवडणूक लढवावी याकरता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली होती.

">

प्रियांकानंतर आता पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात? फेसबुकवर म्हणाले...

रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे ईडीचा ससेमिरा

रॉबर्ट वाड्रा यांच्यामागे सध्या मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये ईडीचा सेसमिरा लागला आहे. आत्तापर्यंत रॉबर्ट वाड्रा यांची ईडीनं तीन वेळा कसून चौकशी केली आहे. यावेळी वाड्रा यांनी ही भाजपची राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना प्रियांका गांधी यांनी देखील मी कुटुंबाच्या मागे ठामपणे उभी असल्याचं म्हटलं होतं.

रॉबर्ट वाड्रा ईडीच्या जाळ्यात; विचारले ‘हे’ प्रश्न

काय आहे मनी लाँड्रिंग प्रकरण?

मनी लाँडरिंगचं प्रकरण लंडनमधील मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील 'ब्रायनस्टन स्क्वेअर' येथे 17 कोटी रूपयांचा प्लॅट रॉबर्ट वाड्रा यांनी खरेदी केला होता. फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. शिवाय, हा फ्लॅट देखील वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे.

VIDEO : SUV कारने आईसमोरच चिरडलं, काही क्षण लहानग्यावरच उभी होती गाडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading