रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीवर प्रियांका गांधींनी ही दिली प्रतिक्रिया!

रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीवर प्रियांका गांधींनी ही दिली प्रतिक्रिया!

वाड्रा यांच्या चौकशीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीत बुधवारी राजकीय घडामोडींनी भरलेला होता. काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागलं. प्रियांका गांधी या रॉबर्ट यांच्यासोबत ईडीच्या ऑफिसपर्यंत आल्या आणि पुन्हा काँग्रेस मुख्यालयात परत जाऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ईडीच्या चौकशीचं जे काही सुरू आहे त्याच्या मागचं खरं कारण सर्व जगाला माहित आहे अशी प्रतिक्रिया प्रियांका यांनी काँग्रेस मुख्यालयात व्यक्त केली. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचं त्यांना त्यातून सूचित करायचं होतं.

तपास यंत्रणांपुढे हजर होण्याची रॉबर्ट वाड्रा यांची ही पहिलीच वेळ आहे. रॉबर्ट वाड्रा यांना जवळपास 40 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील अशी माहिती समोर येत आहे. ईडी कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांची टीम हजर झाली होती.

दरम्यान, मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी रॉबर्ट वाड्रा यांनी पटियाला कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. रॉबर्ट यांची रात्री उशीरा पर्यंत ही चौकशी चलण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

मनी लाँडरिंगचं प्रकरण लंडनमधील मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील 'ब्रायनस्टन स्क्वेअर' येथे 17 कोटी रूपयांचा प्लॅट रॉबर्ट वाड्रा यांनी खरेदी केला होता. फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. शिवाय, हा फ्लॅट देखील वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे.

VIDEO : गोपीनाथ मुंडेंचं अपघातात निधन होऊच शकत नाही - धनंजय मुंडे

First published: February 6, 2019, 7:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading