Home /News /national /

महाराष्ट्रातील अट्टल चोरांची Google Mapच्या मदतीने कर्नाटकात चोरी, लंपास केले 28 लाखांचे दागिने

महाराष्ट्रातील अट्टल चोरांची Google Mapच्या मदतीने कर्नाटकात चोरी, लंपास केले 28 लाखांचे दागिने

गुगल मॅप्सचा (Google Maps) उपयोग आपल्याला रस्ता कळण्यासाठी होत असला तरी दोन चोरांनी या गुगल मॅपचा वापर करून कर्नाटकमधील अनेक घरांमध्ये चोरी केली आहे

    मुंबई, 30 ऑक्टोबर : नवीन ठिकाणी राहण्यास गेल्यानंतर रस्ते माहीत नसल्यामुळे अनेकदा आपण रस्ता चुकतो. कधी कधी तर माहित असणाऱ्या ठिकाणी देखील गोंधळायला होतं. पण हल्ली गुगल मॅप्समुळे (Google Maps) अर्धे कष्ट कमी केले आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही रस्ता शोधू शकता आणि कोणत्या रस्त्यावर ट्राफिक आहे हे देखील पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला हव्या त्या ठिकाणी लवकर पोहोचण्यास मदत होते. पण या गुगल मॅप्सचा उपयोग आपल्याला रस्ता कळण्यासाठी होत असला तरी दोन चोरांनी या गुगल मॅपचा वापर करून कर्नाटकमधील अनेक घरांमध्ये चोरी केली आहे. महाराष्ट्रात राहून हे चोर आपले कर्नाटकमधील चोरी करण्याचे टार्गेट ठरवत असतं. कर्नाटकमधील बेळगावी याठिकाणी त्यांनी जवळपास 11 मंदिरं आणि अनेक घरांमध्ये लूट केली आहे. पोलिसांनी या दोन चोरांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 28.08 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 11.50 लाखांची चारचाकी जप्त केली आहे. प्रशांत करोशी आणि अविनाश अडावकर अशी या दोघांची नावं असून प्रशांत हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील इस्पुर्ली गावातील आहे तर प्रशांत हा आजरा तालुक्यातील दमाणे गावचा रहिवासी आहे. (हे वाचा-Mirzapur 2: कालीन भैया ते गुड्डू पंडित सगळे आहेत करोडपती! वाचा किती आहे संपत्ती) याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेजण गुगल मॅपच्या मदतीने शहराबाहेरील घरं टार्गेट करत असतं. त्यानंतर काही दिवस त्या घरांवर पाळत ठेऊन घर रिकामे दिसल्यास तिथे चोरी करत असतं. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी तीन घरांमध्ये चोरी केल्याचं कबूल केलं असून, त्या घरांमधून त्यांनी दागिन्यांची चोरी केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील त्यांनी अनेक ठिकणी चोरी केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सी. आर. निल्गार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ही माहिती दिली. सध्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. (हे वाचा-मोठी बातमी! शेतकऱ्यांना नाही मिळणार व्याजावरील व्याज माफ योजनेचा फायदा) दरम्यान, अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडली नसून 2018 मध्ये चेन्नईतही अशाच प्रकारे गुगल मॅप्सच्या मदतीने चोरी करताना हैदराबादच्या दोन जणांना अटक करण्यात आली होती. हे दोघंदेखील चोरी करण्यासाठी अशाच पद्धतीचा वापर करत होते. हे दोघे जण हैदराबादवरुन चेन्नईला विमानाने जात असत आणि त्यानंतर रिक्षामधून त्या ठिकाणी पोहोचून घर रिकामे दिसल्यास चोरी करत असत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Crime, Crime news, Robbery, Robbery Case, Theft

    पुढील बातम्या