News18 Lokmat

हार्दिक पटेलचा सुरतमध्ये रोड शो

सुरतमधल्या हाथीमंदीरापासून हार्दिकच्या रॅलीला सुरूवात झाली. टप्प्याटप्प्यानं रोडशो करत संध्याकाळी बीआरटीएस चौकात पोचेल जिथे संध्याकाळी हार्दिक पटेल जनतेला संबोधित करतील. सुरत जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमधे पाटीदार मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2017 01:54 PM IST

हार्दिक पटेलचा सुरतमध्ये रोड शो

03 डिसेंबर: पाटीदार समाजाचे नेता हार्दिक पटेल यांनी आज सुरत शहरामधे भव्य रोडशो केला.गुजरातच्या रणधुमाळीत सध्या जोरदार प्रचार सुरू आहे.

सुरतमधल्या हाथीमंदीरापासून हार्दिकच्या रॅलीला सुरूवात झाली. टप्प्याटप्प्यानं रोडशो करत संध्याकाळी बीआरटीएस चौकात पोचेल जिथे संध्याकाळी हार्दिक पटेल जनतेला संबोधित करतील.  सुरत जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमधे पाटीदार मतदार मोठ्या प्रमाणात  आहेत.  आज शहरानंतर इतर ठिकाणीही हार्दिक रोडशो करणार आहेत. कतारगाम, वराछा, करंज आणि कामरेज या चारही मतदारसंघात भाजपला पाटीदारांचा कडवा सामना करावा लागणार आहे.

गुजरातच्या निवडणुकीसाठी 8 डिसेंबर आणि 13 डिसेंबरला मतदान करण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींपासून राहुल गांधीपर्यंत सर्वच नेत्यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...