S M L

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून नवज्योतसिंग सिद्धू निर्दोष

रोडरेज केसप्रकरणी ३० वर्षानंतर माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलासा मिळाला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 16, 2018 08:12 AM IST

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून नवज्योतसिंग सिद्धू निर्दोष

मुंबई, 16 मे : रोडरेज केसप्रकरणी ३० वर्षानंतर माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलासा मिळाला आहे. सिद्धूंची सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. रोडरेज प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सिद्धूंची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र पंजाब-हरयाणा उच्चन्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बदलून सिद्धूंना दोषी ठरवलं होतं. या खटल्यात उच्च न्यायालयाने त्यांना तीन वर्षाची शिक्षाही सुनावली होती.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. २७ डिसेंबर १९८८ मध्ये पटियाला येथील गुरनाम सिंह यांना सिद्धूने बुक्का मारला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 08:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close