• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 25 foot खोल खड्ड्यात कोसळली Congress नेत्याची गाडी, पुढं जे घडलं ते पाहून सगळेच हैराण

25 foot खोल खड्ड्यात कोसळली Congress नेत्याची गाडी, पुढं जे घडलं ते पाहून सगळेच हैराण

गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी 25 फूट खोल खड्ड्यात (Road Accident) कोसळली. इतकंच नाही तर ही कार विजेच्या खांबालाही धडकली.

 • Share this:
  इंदौर 31 मार्च : एखादी चारचाकी 25 फूट खोल खड्ड्यात पडली तर काय घडेल? ही घटना अत्यंत भयानक असेल. मात्र, देव तारी त्याला कोण मारी हे वाक्य खरं झालं आहे काँग्रेसच्या एका नेत्याच्या बाबतीत. ही घटना आहे मध्य प्रदेशमधील इंदौरची. इथे एक काँग्रेस नेत्याचा मोठा अपघात (Accident of Congress Leader) झाला. मात्र, नशीब आणि तांत्रिक गोष्टींमुळे या नेत्याचा जीव वाचला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सदाशिव यादव मंगळवारी एका कार्यक्रमासाठी पिवडाय येथे जात होते. याच दरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली. यादव यांच्या गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी 25 फूट खोल खड्ड्यात (Road Accident) कोसळली. इतकंच नाही तर ही कार विजेच्या खांबालाही धडकली. या घटनेत जिल्हाध्यक्ष यादव जखमी झाले. डोक्याला मार लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव यादव यांच्याशिवाय गाडीमध्ये असलेला चालक आणि यादव यांचा एक मित्र यांनाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. पिवडाय येथे जाताना यादव यांच्या गाडीचा बॅलन्स अचानक बिघडला. यानंतर गाडी रस्त्याहून खाली उतरली. गाडी खड्ड्यात वेगात पुढे गेली मात्र पुढे विजेच्या खांबाला जाऊन धडकली. विजेच्या खांबाला गाडी धडकल्यानंतर त्यातील एअर बॅग उघडली गेली. यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मोठी दुर्घटना टळली. वेळेवर एअर बॅग उघडली नसती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. इतकंच नाही तर कारमध्ये बसलेल्या लोकांच्या तत्परतेमुळेही त्यांचा जीव वाचू शकला.
  Published by:Kiran Pharate
  First published: