संदीप राजगोळकर,बंगळुरू, 17 नोव्हेंबर : पर्यटकांची खासगी बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने कर्नाटकात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले तर 9 जण जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त पर्यटक हे मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
धारवाड जिल्हातील भद्रापूर गावाजवळ रात्री हा अपघात झाला. खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. सहलीसाठी मुंबईहून कर्नाटकात गेलेल्या 6 पर्यटकांनी या अपघातात आपला जीव गमावला आहे. या भीषण अपघातात 6 जण जखमीही झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने या जखमींना जवळच्या हुबळीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईचे रहिवासी असलेले हे पर्यटक सहलीसाठी खासगी बसने गेले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. ही घटना समजताच अपघातग्रस्तांच्या मुंबईतील नातावाईकांना याची माहिती देण्यात आली आहे. ही दुर्देैवी घटना समजल्यानंतर अपघातग्रस्त्यांच्या नातेवाईकांमी मोठा आक्रोश केला.
रस्ते अपघात ही अलिकडच्या काळात मोठी समस्या ठरत आहे. गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे असे अपघात रोखायचे असे, हा मोठा प्रश्न आहे.
VIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा